मेलबर्न : मुंबई पोलिसांनी काल मध्यरात्री भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी मध्यरात्री साडे तीन वाजता विमानतळाजवळील ड्रॅगन फ्लाय क्लबवर छापा टाकला. पण रैना या हॉटेलमध्ये नेमका काय करत होता, याची माहिती आता पुढे आलेली आहे. रैनाच्या व्यवस्थापकीय टीमने यावेळी एक मेल केला आहे आणि तो तिथे कशासाठी गेला होता, याचा खुलासाही करण्यात आला आहे. रैनाच्या व्यवस्थापकीय टीमने एक पत्रक काढले आहे. या पत्रकामध्ये लिहिले आहे की, " रैना त्या हॉटेलमध्ये एका शुटिंगसाठी गेला होता. त्याचे काम रात्री उशिरा संपले. त्यानंतर रैनाला त्याच्या एका मित्राने डिनरसाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर रैनाला दिल्लीला रवाना व्हायचे होते. रैनाला यावेळी मुंबईमध्ये नेमके काय नियम आहेत, याबद्दक काहीच कल्पना नव्हती. पण जेव्हा रैनाला ही गोष्ट समजली तेव्हा त्याने पोलिसांना सहकार्य केले. रैना हा नियम पाळणारा व्यक्ती आहे आणि त्याने हे जाणूनबुजून केलेले नाही. यापुढेही रैना नियम पाळेल आणि सर्वांना नक्कीच सहकार्य करेल." मुंबई पोलिसांनी काल मध्यरात्री भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी मध्यरात्री साडे तीन वाजता विमानतळाजवळील ड्रॅगन फ्लाय क्लबवर छापा टाकला. त्यावेळी या क्लबने करोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवले होते. या क्लबमध्ये सुरेश रैनासह ऋतिक रोशनची माजी पत्नी सुझॅन आणि गायक गुरु रंधवाही होते. या सर्वासह एकूण ३४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने काही नियम बनवले आहेत. त्यानुसार रात्री ११ वाजल्यानंतर कोणतीही पार्टी करण्यास बंदी आहे. पण विमानतळावरील जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमधील ड्रॅगन फ्लाय क्लबमध्ये रात्री ११ नंतरही पार्टी सुरु होती. पोलिसांनी मध्यरात्री साडे तीन वाजता जेव्हा या क्लबवर छापा टाकला. त्यावेळीही तिथे पार्टी सुरुच होती. त्यामुळे पोलिसांनी यावेळी सर्वांनाच अटक केल्याचे पाहायला मिळत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JanTpa
No comments:
Post a Comment