नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने मंगळवारी धनश्री वर्माबरोबर लग्न केले. त्यानंतर चहलला आजी-माजी क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या. यामध्ये भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू रोहित शर्माचाही समावेश होता. चहल हा सोशल मीडियावर भरपूर मस्ती-मस्करी करून बऱ्याच जणांचे पाय ओढत असतो. त्यामुळे रोहितने चहलला शुभेच्छा देताना चांगलीच गुगली टाकल्याचे पाहायला मिळाले आहे. रोहितचे ट्विट यावेळी चांगलेच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. रोहित यावेळी म्हणाला की, " युजवेंद्र आणि धनश्री या दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा. युजवेंद्र, तु ज्या गुगली टाकतोस त्या मैदानात टाकत जा धनश्रीसमोर नको..." भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा मंगळवारी विवाहसोहळा पार पडला. पण या दोघांची लव्हस्टोरी नेमकी कशी आणि कुठे सुरु झाली, याबाबत मात्र बऱ्याच जणांना माहिती नसेल. पण बॉलीवूडच्या चित्रपटांसारखीच त्यांची लव्हस्टोरी रंगल्याचे पाहायला मिळाले. याबाबत धनश्रीने सांगितले की, " भारतामध्ये करोनामुळे लॉकडाऊन सुरु होते. त्यावेळी मी माझ्या डान्सचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हे व्हिडीओ चहलने पाहिले होते. चहलला माझा डान्स आवडला होता आणि त्याला माझ्याकडून काही गोष्टी शिकायच्या होत्या. त्यामुळे आमचे पहिल्यांदा शिक्षक आणि विद्यार्थी असे नाते होते." धनश्री पुढे म्हणाली की, " चहलला माझ्याकडून काही गोष्टी शिकायच्या होत्या, त्यामध्ये डान्सचाही समावेश होता. त्याने माझ्याशी संपर्क साधला आणि मला मार्गदर्शन करणार का, असे विचारले. त्यानंतर मी त्याची शिकवणी घ्यायला लागले. या सर्व कालावधीमध्ये आमच्यामधील शिक्षक आणि विद्यार्थी हे नाते बदलले आणि आम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनलो. आमच्यामध्ये मैत्री झाल्यावर दोघांनी काही गोष्टी शेअर केल्या. त्यानंतर आमच्यामधील संवाद वाढला आणि एकेदिवशी चहलने मला प्रपोज केले. त्यानंतर मीदेखील जास्त वेळ घेतला नाही आणि चहलला होकार कळवला." आयपीएलसाठी युएईला जाण्यापूर्वी चहलने कोरिओग्राफर असलेल्या धनश्री वर्माबरोबर साखरपुडा केला होता. त्यानंतर चहल हा आयपीएल खेळण्यासाठी युएईला गेला होता. त्यानंतर चहल ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता आणि तिथे वनडे आणि ट्वेन्टी-२० मालिका खेळला होता. पण ही मालिका संपवून मायदेशात परतल्यावर चहलने धनश्रीबरोबर मंगळवारी लग्न केल्याचे पाहायला मिळाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aElkHc
No comments:
Post a Comment