चेन्नई: भारताचे माजी क्रिकेटपटू () यांनी आज बुधवारी चेन्नईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणूक होणार आहे असून त्याआधी त्याने भाजपचे कमळ हातात घेतले. यावेळी भाजपचे राज्याचे प्रभारी सीटी रवी आणि पक्षाचे अध्यक्ष एल मुरूगन उपस्थित होते. वाचा- वाचा- कालच मंगळवारी सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात येणार नसल्याची घोषणा केली. यावर प्रतिक्रिया देताना सीटी हवी म्हणाले, रजनीकांत एक महान नेते आहेत. आम्ही त्यांचा सम्मान करतो. त्यांच्या ताकदीची आम्हाला कल्पना आहे. ते नेहमी देशाचे हित आणि तामिळनाडूच्या हितासाठी उभे राहिले आहेत. वाचा- विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवरामकृष्णन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून ते पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. भारताच्या या माजी फिरकीपटूने ९ कसोटीत आणि १६ वनडेत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटीत त्यांनी ४४.०४च्या सरासरीने २६ तर वनडेत ३५.८७ च्या सरासरीने १५ विकेट घेतल्या आहेत. एप्रिल १९८३ रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध त्यांनी पदार्पण केले. तर जानेवारी १९८६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरची कसोटी खेळली. वनडेत फेब्रुवारी १९८५ मध्ये शिवरामकृष्णन यांनी पाकिस्तान विरुद्ध पदार्पण केले आणि ऑक्टोबर १९८७ साली झिम्बब्वे विरद्ध अखेरची वनडे खेळली. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ते समालोचक म्हणून कार्यरत होते. वाचा- राजकारणात आलेले भारताचे माजी क्रिकेटपटू >मोहम्मद अझरूद्दीन >गौतम गंभीर >नवज्योत सिंग सिद्धू >किर्ती आझाद >चेतन चौहान >मोहम्मद कैफ >मन्सूर अली खान पटौदी > विनोद कांबळी > मनोज प्रभाकर
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2X1L1JH
No comments:
Post a Comment