मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. पण या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा एक दिग्गज खेळाडू या सामन्यात खेळू शकणार नाही, त्याचबरोबर त्यांचा एक गोलंदाजालाही या सामन्याला मुकावे लागणार असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसला आहे. कारण या सामन्यात त्यांचा धडाकेबाज खेळाडू डेव्हिड वॉर्नर संघात पुनरागमन करणार होता. वॉर्नरला मर्यादीत षटकांचे सामने खेळताना गंभीर दुखापत झाली होती. पण वॉर्नर अजूनही या दुखापतीमधून सावरलेला दिसत नाही. त्यामुळे त्याचा समावेश दुसऱ्या कसोटी सामन्यात करता येणार नाही, असेच चित्र आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळानेदेखील याबाबतचा खुलासा केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हा मोठा धक्का असेल, असे म्हटले जात आहे. वॉर्नरबरोबर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज सीन अॅबॉटही या सामन्यात खेळू शकणार नसल्याचे समजत आहे. कारण भारतीय संघाबरोबरच्या सराव सामन्यात सीनला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर तो अजूनही फिट झालेला नाही. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही, असे आता स्पष्ट होताना दिसत आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला डेव्हिड वॉर्नर आणि सीन अॅबॉट यांच्याशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने नेमके काय सांगितले, पाहा...डेव्हिड वॉर्नरला भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दुखापत झाली होती. त्यानंतर वॉर्नर ट्वेन्टी-२० मालिका खेळू शकला नव्हता. पण वॉर्नर अजूनही या दुखापतीमधून सावरलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी तो संघासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. त्याचबरोबर भारतीय संघाबरोबरच्या सराव सामन्यात सीनला गंभीर दुखापत झाली होती. तो आता दुखापतीतून सावरताना दिसत आहे. पण भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी तो संघनिवडीसाठी उपलब्ध असू शकणार नाही. त्यामुळे भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी हे दोन्ही खेळाडू खेळू शकणार नाहीत, असे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने सांगितले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nImvsU
No comments:
Post a Comment