मेलबर्न: भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली असून त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात चार बदल करण्यात आले असून ऑस्ट्रेलिया संघाने कोणताही बदल केलेला नाही. पहिल्या कसोटीत भारताचा ८ विकेटनी पराभव झाला होता. आता मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटीत भारताला मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Live अपडेड (AUS vs IND 2nd Test) >> भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी हा १००वा कसोटी सामना आहे. ऑस्ट्रेलिया-४३ विजय भारत- २८ विजय टाय- १ ड्रॉ-२७ >> ऑस्ट्रेलियाच्या संघात कोणताही बदल नाही >> भारतीय संघाकडून शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज पदार्पण कसोटीत करणार >> दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38vlZYY
No comments:
Post a Comment