मेलबर्न: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिका खेळणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्या सामन्याच्या आधी एक मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. स्टार सलामीवीर रोहित शर्माने क्वारंटाइन कालावधी पूर्णकरून संघात दाखल झालाय. रोहितने ३१ डिसेंबर रोजी सराव करण्यास सुरूवात केली. भारताचे फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या देखरेखीखाली रोहितने सराव केला. रोहित भारतातून सिडनीत गेला होता. त्यानंतर क्वारंटाइन कालावधी पूर्ण करून बुधवारी मेलबर्नमध्ये दाखल झाला. वाचा- रोहित दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला नव्हता. मर्यादीत षटकांच्या मालिकेत त्याचा समावेश केला गेला नाही. तसेच कसोटी मालिकेतील दोन लढतीत त्याला खेळता आले नाही. त्यानंतर फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर तो ऑस्ट्रेलियात दाखल झाला. पण संघात दाखल होण्याआधी त्याला नियमानुसार क्वारंटाइन व्हावे लागले. वाचा- तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ ४ जानेवारी रोजी सिडनीत पोहोचणार आहे. नियोजित वेळेनुसार संघ ३१ डिसेंबर रोजी सिडनीत जाणार होता. पण तेथे करोना स्थितीमुळे यात बदल करण्यात आला. बीसीसीआय () ने गुरुवारी सोशल मीडियावर रोहितच्या सराव सत्राचे अपडेट दिले. रोहित मैदानात सराव करत असतानाचे दोन फोटो शेअर करताना, हिटमॅन येथे आला आहे आणि इंजिन सुरू झाले आहे, असे त्यांनी म्हटलय. वाचा- भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी रोहितचा संघात समावेश करायचा की नाही याबाबतचा निर्णय त्याच्या फिटनेसनुसार घेतला जाईल असे म्हटले होते. तिसरा कसोटी सामना सात जानेवारीपासून सिडनीत होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2WV7E2y
No comments:
Post a Comment