दुबई: आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत २०१५ पासून अव्वल स्थानी राहिलेल्या ( ) आणि स्टिव्ह स्मिथ () यांचे संस्थान अखेर खालसा झाले आहे. न्यूझीलंडचा कर्णधार () याने अव्वल स्थान मिळवले आहे. गुरुवारी आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली या ताज्या क्रमवारीत त्याने विराट आणि स्मिथ यांना मागे टाकले. वाचा- केन विलियमसनने वेस्ट इंडिजविरुद्ध २५१ धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत १२९ धावा केल्या. कसोटी क्रमवारीत पाच वर्षानंतर केन अव्वल स्थान मिळवले आहे. याआधी २०१५ साली तो काही काळ अव्वल स्थानावर होता. पण त्यानंतर पहिल्या स्थानावर कधी विराट कोहली तर कधी हे दोघे अलटून पालटून पहिल्या स्थानावर होते. वाचा- वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानविरुद्ध धमाकेदार शतकी खेळी करत केनने विराट आणि स्मिथ या दोघांचे वर्चस्व संपवले. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर केनला १३ गुण मिळाले. त्याने या सामन्यात १२९ आणि २१ धावा केल्या. यामुळे त्याच्याकडे स्मिथपेक्षा १३ तर विराट पेक्षा ११ अधिक गुण झाले. विराट सध्या सुट्टीवर आहे त्यामुळे कसोटी सामने खेळत नाही. तर स्मिथने भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत फक्त १० धावा केल्या आहेत. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेला देखील ताज्या क्रमवारीत फायदा झाला आहे. मेलबर्नमध्ये ११२ आणि नाबाद २७ धावा करणारा अजिंक्य टॉप १० मध्ये परत आला आहे. तो आता क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर आहे. ते ऑक्टोबर २०१९ मध्ये पाचव्या क्रमांकावर होता. गोलंदाजीत भारताचा जलद गोलंदाज आर अश्विन दोन स्थानांनी पुढे गेला असून तो सध्या सातव्या क्रमांकावर आहे. तर जसप्रीत बुमराह एक स्थानांनी पुढे जात नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. अष्टपैलू रविंद्र जडेजा क्रमवारीत सर्वाधिक फायदा झाला आहे. तो फलंदाजीत ३६व्या तर गोलंदाजीत १४व्या क्रमांकावर पोहोचला आहे. अष्टपैलूंच्या यादीत त्याने तिसरे स्थान कामय राखले आहे. वाचा- मेलबर्न कसोटीत पदार्पण करणारा शुभमन गिल ७६व्या तर मोहम्मद सिराज ७७ व्या स्थानावर आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rFDlv1
No comments:
Post a Comment