नवी दिल्ली: एडिलेड येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताची कामगिरी सर्वात खराब झाली. आता मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल करू शकते. २६ डिसेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर बॉक्सिंग डे कसोटी भारतीय संघ कमबॅक करण्याच्या इराद्याने उतरेल. वाचा- ऑस्ट्रेलियाने एडिलेड कसोटीत ८ विकेटनी विजय मिळून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटीपासून कर्णधार खेळणार नाही. तो मुलाच्या जन्मासाठी भारतात येणार आहे. विराटच्या ऐवजी संघात लोकेश राहुलला संघात घेतले जाईल हे जवळपास निश्चित मानले जाते. वाचा- भारतीय संघाचे माजी मुख्य निवडसमिती प्रमुख एमएसके प्रसाद यांच्या मते विराट कोहलीच्या क्रमांक चारवर हनुमा विहारीने फलंदाजी करावी तर लोकेश राहुलने क्रमांक सहाव फलंदाजी करावी. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना प्रसाद म्हणाले, पुढील काही सामन्यात विहारीला क्रमांक चारवर फलंदाजी करताना पाहायला मला आवडले. मला विश्वास आहे की तो चांगली कामगिरी करेल. या मालिकेत राहुलने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावी. वाचा- विहारीकडे कसोटी क्रिकेट खेळण्याचे चांगले तंत्र आणि विचार आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये संघाकडून मोठ्या कालावधीसाठी खेळू शकतो. विराटच्या गैरहजेरीत विहारी आणि राहुल यांच्याकडे खुप चांगली संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून अपयशी ठरणाऱ्या पृथ्वी शॉला दुसऱ्या कसोटी सामन्यात बाहेर बसवले जाऊ शकते. तर रोहित शर्मा तिसऱ्या कसोटीआधी संघात खेळू शकणार नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या सराव सामन्यात शुभमन गिलला सलामीला पाठवले जाऊ शकते. वाचा- पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात अपयशी ठरलेल्या वृद्धीमान साहाला संघाती स्थान गमवावे लागू शकते. त्याच्या जागी ऋषभ पंतचा विचार केला जाऊ शकतो. पंतने सराव सामन्यात धमाकेदार शतकी खेळी केली होती. भारताच्या गेल्या म्हणजे २०१८ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने शतकी खेळी केली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3reuvE9
No comments:
Post a Comment