मेलबर्न, : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने या विजयाचे विश्लेषण केले आहे. या विजयानंतर अजिंक्यने बऱ्याच गोष्टी सांगितल्या. अजिंक्य म्हणाला की, " अॅडलेडमध्ये फक्त एका तासात आम्हाला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे त्या सामन्याचा जास्त विचार करायचा नाही, हे आम्ही ठरवले होते. त्यामुळे आम्ही आमच्या गुणवत्तेवर जास्त लक्ष केंद्रीत केले आणि गेल्या सामन्यातील चित्र आम्ही बदलू शकतो, यावर आमचा विश्वास होता. जर दुसरा सामना जिंकायचा असेल तर त्यासाठी नेमकं काय करायला हवं, हे आम्हाला माहिती होते आणि तेच आम्ही केले. त्यानंतरचा निकाल तुमच्यासमोर आहे." प्रथम फलंदाजी करायची होती, पण...मेलबर्नवर आतापर्यंत दुसऱ्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघ जिंकलेला नाही. हेदेखील अजिंक्यच्या मनात होते. याबाबत अजिंक्य म्हणाला की, " " मेलबर्नवर प्रथम फलंदाजी करायची, हे माझ्या मनात होते. पण नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि त्यांनी फलंदाजी स्विकारली. पण त्यानंतर ज्यापद्धतीने भारतीय गोलंदजांनी जो शिस्तबद्ध मारा केला, त्याला तोड नाही. आर. अश्विनला मी १०व्या षटकात गोलंदाजी दिली आणि त्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला." या खेळाडूंनी मनं जिंकली...या सामन्यात पदार्पण करणाऱ्या शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज या दोन खेळाडूंनी अजिंक्यचे मन जिंकले. याबाबत अजिंक्य म्हणाला की, " याा सामन्या पदार्पण करणाऱ्या शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांनी माझे मन जिंकले. कारण त्यांचा हा पहिला सामना होता आणि या दोघांनीही चमकदार कामगिरी केली. माझ्यामते यामध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटचा महत्वाचा वाटा आहे. ३-४ वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळल्याचा फायदा यावेळी शिभमन गिलला झाला. त्याचबरोबर सिराजनेही यावेळी संयम दाखवत अचूक मारा केला." अजिंक्य रहाणेच्या बाबतीत घडला असा योगायोगरहाणेने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरच्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात नेतृत्व करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. पण यापूर्वी जेव्हा रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथील सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते, तेव्हादेखील काही गोष्टी अशाच घडल्याचे पाहायला मिळाले होते. धरमशाला येथे झालेल्या सामन्यात कोहली खेळणार खेळणार नव्हता आणि मालिका १-१ अशी बरोबरीत होती. या सामन्यातील दोन्ही डावांत रहाणेने दमदार फलंदाजी केली होती. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रहाणेने या सामन्यातही मैदानावर येऊन विजय साकारला होता. आजच्या सामन्यात रहाणे फलंदाजीला येईल की नाही, माहिती नव्हते. पण भारताचे दोन फलंदाज बाद झाले आणि रहाणे फलंदाजीला आला. हा या दोन्ही सामन्यांतील योगायोग म्हणाला लागेल. अजिंक्यने या सामन्यात विजयी धावही घेतली. त्यामुळे अजिंक्य आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये नेतृत्व करताना दोन्ही वेळेला पास झालेला पाहायला मिळत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2WVJvJ2
No comments:
Post a Comment