मुंबई: ८०च्या दशकात ()सोबत क्रिकेट खेळलेले मुंबईचे माजी क्रिकेटपटू ( ) यांचे शनिवारी करोना व्हायरसने निधन झाले. विजय शिर्के यांचे शनिवारी ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. विजय हे सचिन तेंडुलकर आणि यांच्या सोबत क्रिकेट खेळले होते. वाचा- गेल्या तीन महिन्यात करोना व्हायरसने सचिन तेंडुलकरच्या दुसऱ्या मित्राचे करोना व्हायरसने निधन झालेय. याआधी ऑक्टोबर महिन्यात सचिनचा जवळचा मित्र अवी कदम यांचे करोना व्हायरसमुळे निधन झाले होते. शिर्के यांच्या निधनामुळे मुंबई क्रिकेटला आणखी एक धक्का बसला आहे. काही वर्षांपूर्वी शिर्के मुंबईतून ठाण्याला राहण्यास आले होते. ठाण्यातील एका रुग्णालयात त्यांचे निधन झाले. करोना व्हायरसमधून ते बरे होत होते. पण अचानक त्यांचे निधन झाल्याचे एका जवळच्या मित्राने सांगितले. वाचा- विजय शिर्के यांच्या निधनावर सचिनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. विजय शिर्केला श्रद्धांजली, मी त्याला १५व्या वर्षापासून ओळख होतो. त्याच्या सोबत घालवलेला काळ हा आनंदी आणि मजेशीर असा होता. त्या आठवणी नेहमी माझ्या सोबत राहतील. त्याच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असे सचिनने म्हटले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १७ वर्षाखालील उन्हाळी शिबारात ते प्रशिक्षक म्हणून दोन वर्ष कार्यरत होते. विजय शिर्केच्या निधनाने माझे वैयक्तीक नुकसान झाले आहे. हॅरिस शिल्ड स्पर्धेत झालेल्या विक्रमी भागिदारीनंतर आम्ही मफतलाल यांच्याकडून खेळत होतो. आमचा एक चांगला संघ होता आणि संदीप पाटील कर्णधार होते. विजय एक मन मिळावू खेळाडू होता, असे विनोद कांबळीने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. नव्या चेंडूने तो फार शानदार गोलंदाजी करायचा. त्याच्याकडे चेंडू स्विंग करण्याची नैसर्गिक शैली होती, अशी आठवण कांबळीने सांगितली. भारताचा माजी क्रिकेटपटू सलिल अंकोलाने देखील विजय शिर्के यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37yG5SN
No comments:
Post a Comment