मेलबर्न : दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर गुंडाळण्यात यश मिळवले. भारताकडून जसप्रीत बुमराहने चार तर आर. अश्विन ()ने तीन विकेट घेतल्या. या सामन्यात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने दोन विकेट मिळवल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने १ बाद ३६ धावा केल्या होत्या. शुभमन गिल २६ तर पुजारा ७ धावांवर खेळत होता. वाचा- ऑस्ट्रेलियाच्या डावात अश्विनने स्टीव्ह स्मिथला शून्यावर माघारी पाठवले. कसोटीत भारताविरुद्ध असे प्रथमच झाले आहे की स्मिथ मोठी धावसंख्या न करता बाद झाला. अश्विनने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू वेडची विकेट घेतली. अश्विनला वेडची विकेट मिळून देण्यात विकेटकीपर ( ) ची मोठी भूमिका होती. वेड विरुद्ध कसा चेंडू टाकायचे हे पंतने सांगितले आणि त्यानंतर अश्विला विकेट मिळाली. विकेटकीपर म्हणून भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी गोलंदाजांना अशा प्रकारचे मार्गदर्शन करायचा. वाचा- या घटनेचा एक व्हिडिओ क्रिकेट चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पंत अश्विनला सांगतो की, चेंडू आतल्या बाजूला ठेव. नक्की मारण्याचा प्रयत्न करेल. अश्विनने त्यानंतरचा चेंडू अगदी तसाच टाकला आणि वेडने हवेत शॉट मारला. त्याचा कॅच रविंद्र जडेजाने घेतला. हा कॅच घेताना शुभमन गिल आणि जडेजा एकमेकांना धडके पण कॅच सुटला नाही. वाचा- वेडची विकेट मिळवून देण्यात पंतचा सल्ला उपयोगी पडल्याने सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या तीन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. यात (३०), स्टीव्ह स्मिथ (०) आणि टीम पेन (१३) यांचा समावेश आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34LBACG
No comments:
Post a Comment