मेलबर्न, : कर्णधार अजिंक्यच्या बाबतीत एक सुंदर योगायोग यावेळी पाहायला मिळाला. भारताने आज ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला, पण यावेळी रहाणेबाबतचा एक योगायोग आता पुढे आला आहे. रहाणेने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरच्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात नेतृत्व करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात रहाणेची एक खेळाडू म्हणूनही भूमिका निर्णायक होती. पण यापूर्वी जेव्हा रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथील सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते, तेव्हादेखील काही गोष्टी अशाच घडल्याचे पाहायला मिळाले होते. धरमशाला येथे झालेल्या सामन्यात कोहली खेळणार खेळणार नव्हता आणि मालिका १-१ अशी बरोबरीत होती. या सामन्यातील दोन्ही डावांत रहाणेने दमदार फलंदाजी केली होती. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रहाणेने या सामन्यातही मैदानावर येऊन विजय साकारला होता. आजच्या सामन्यात रहाणे फलंदाजीला येईल की नाही, माहिती नव्हते. पण भारताचे दोन फलंदाज बाद झाले आणि रहाणे फलंदाजीला आला. हा या दोन्ही सामन्यांतील योगायोग म्हणाला लागेल. अजिंक्यने या सामन्यात विजयी धावही घेतली. त्यामुळे अजिंक्य आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये नेतृत्व करताना दोन्ही वेळेला पास झालेला पाहायला मिळत आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाने यावेळी कमाल केली. पहिल्या सामन्यातील मानहानीकारक पराभव पचवल्यानंतर रहाणेने चांगली संघ बांधणी केली. खेळाडूंना विश्वास दिला आणि त्यामुळेच या सामन्यात भारतीय संघाकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली. अजिंक्यने यावेळी संघात निर्णायक बदल केले आणि तेच भारतासाठी महत्वाचे ठरले. अजिंक्यने पृथ्वी शॉला बाहेर करत शुभमन गिलला संधी दिली आणि त्याने चांगली सलामी दिली. त्याचबरोबर रवींद्र जडेजासारख्या अष्टपैलू खेळाडूला संधी दिली आणि त्याची कामगिरी संघासाठी महत्वाची ठरली. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला पदार्पणाची संधी देत संघात चांगला बदल केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ८ विकेटनी शानदार विजय मिळवला. गोलंदाज आणि फलंदाजांनी केलेल्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर भारताने हा विजय साकारला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवण्याची भारताची ही सलग दुसरी वेळ आहे. याआधी २०१८ साली भारताने प्रथम बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवला होता. या विजयासह भारताने २०२०मधील अखेरी लढत जिंकली आणि चाहत्यांना ३१ डिसेंबरची भेट दिली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aVHFjX
No comments:
Post a Comment