नवी दिल्ली: भारतीय संघातील सलामीवीर () गेल्या काही काळापासून खराभ फॉर्ममध्ये आहे. या वर्षाच्या सुरूवातीला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने फक्त ९८ धावा केल्या होत्या. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या दोन सराव सामन्यात पृथ्वीला ६२ धावा करता आल्या. या अपयशानंतर देखील त्याला पहिल्या कसोटीत भारतीय संघात स्थान मिळाले. पण पृथ्वी पहिल्या डावात शून्यावर तर दुसऱ्या डावात चार धावांवर बाद झाला. या खराब कामगिरीमुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. सोशल मीडियावर पृथ्वी शॉ ट्रोल झाल्यानंतर आता त्याने टीकाकारांना सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिले. वाचा- पृथ्वी शॉने इस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे यात तो म्हणतो, एखादी गोष्टी करताना लोक जेव्हा तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात तेव्हा समजून जा की तुम्ही ती गोष्टी निश्चितपणे करू शकता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या एडिलेड कसोटीत क्रिकेटतज्ज्ञांनी त्याच्या फलंदाजीच्या कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले होते. पहिल्या डावात मिचेल स्टार्कच्या चेंडूवर तो बोल्ड झाला होता. तर दुसऱ्या डावात पॅट कमिंन्सच्या चेंडूवर तशाच्य पद्धतीने बाद झाला होता. वाचा- पृथ्वी शॉ बद्दल भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी देखील म्हटले होते की त्याने बचावाचे तंत्र शिकण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने देखील पृथ्वी कसा बाद होऊ शकतो हे सांगितले होते. तर टॉम मूडी यांनी तर पृथ्वी शॉ फ्लॉप झाला नाही तर निवड समिती फ्लॉप झाली आहे, असा शब्दात टीका केली होती. त्याला जाणीवपूर्वीक फ्लॉप करण्यात आल्याचे मूडी म्हणाले. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ८ विकेटनी पराभव झाल्यानंतर आता दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची चर्चा सुरू आहे. यात पृथ्वी शॉला बाहेर बसवले जाऊ शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2KokDqT
No comments:
Post a Comment