मेलबर्न, : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियामध्ये धमाकेदार विजय मिळवला. अजिंक्यने या विजयाने श्रेय दोन खेळाडूंना दिल्याचे पाहायला मिळाले. हे दोन खेळाडूने नेमके आहेत तरी कोण, पाहा... सामन्यानंतर अजिंक्य म्हणाला की, " अॅडलेडमधील पहिल्या कसोटी पराभवानंतर दुसरा सामना खेळणे सोपे नव्हते. या दुसऱ्या सामन्यात आम्ही दणदणीत विजय मिळवला, यासाठी मला संपूर्ण संघाचा अभिमान आहे. पण यावेळी दोन खेळाडूंचे नाव मी खास करून घेईन, कारण त्यांच्यासाठी हा कठिण काळ होता. पण या दोघांनीही दमदार कामगिरी केली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला." अजिंक्य पुढे म्हणाला की, " मी या विजयाचे श्रेय शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांना देईन. कारण पहिल्या सामन्यातील पराभवानंतर खेळणे सोपे नव्हते. त्यामध्येच या दोन्ही खेळाडूंचे पदार्पण होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड दडपण असेल. पण या दोघांनी दडपण जुगारले आणि नेत्रदीपक कामगिरी केली. या दोघांच्या कामगिरीचा वाटा विजयात नक्कीच मोलाचा आहे." गिलने यावेळी सलामीला येताना पहिल्या डावात ४५ धावांची खेळी साकारली, तर दुसऱ्या डावात नाबाद ३५ धावा केल्या. सिराजनेही या सामन्यात भेदक गोलंदाजी करत पाच विकेट्स मिळवल्या. त्यामुळे या दोघांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला. या सामन्यात पदार्पण करणाऱ्या शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज या दोन खेळाडूंनी अजिंक्यचे मन जिंकले. याबाबत अजिंक्य म्हणाला की, " याा सामन्या पदार्पण करणाऱ्या शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांनी माझे मन जिंकले. कारण त्यांचा हा पहिला सामना होता आणि या दोघांनीही चमकदार कामगिरी केली. माझ्यामते यामध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटचा महत्वाचा वाटा आहे. ३-४ वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळल्याचा फायदा यावेळी शिभमन गिलला झाला. त्याचबरोबर सिराजनेही यावेळी संयम दाखवत अचूक मारा केला. त्याचबरोबर संघातील अन्य अनुभवी खेळाडूंना एकमेकांना मोलाची साथ दिली. त्यामुळेच आम्हाला दुसऱ्या सामन्यात विजय मिळवता आला."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3592jtd
No comments:
Post a Comment