मेलबर्न : AUS vs IND 2nd Test ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीला मेलबर्न क्रिकेट मैदानावर सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताने दमदार गोलंदाजी केली. दुसऱ्या सत्राचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेल्याच्या पाच विकेट गेल्या होत्या. यात जो बर्न्स, स्टीव्ह स्मिथ यांना शून्यावर बाद केले. तर मॅथ्यू वेड ३०, हेड ३८ वर तर मार्नस लाबुशाने ४८ वर माघारी परतला. पहिल्या दोन्ही सत्रात भारताच्या खेळाडूंना शानदार फिल्डिंग केली. वाचा- जसप्रीत बुमराहने पहिली विकेट घेतली. त्यानंतर अश्विनने त्याच्या दुसऱ्याच आणि डावातील १३व्या षटकात मॅथ्य वेडला बाद केले. वेडने मारलेला कॅच ()ने घेतला. हा कॅच अवघड पद्धतीने त्याने पकडला. वेडचा कॅच घेण्यासाठी जडेजासोबत () देखील पळाला होता आणि या दोघांची टक्कर देखील झाली. पण जडेजाने कॅच सोडला नाही. वाचा- चेंडू हवेत असताना सर्वांचा श्वास रोखला गेला. कारण हे दोन्ही खेळाडू कॅच घेण्यासाठी आले होते. एका क्षणी असे वाटत होते की ही संधी भारताच्या हातातून सुटले. वेडने ३९ चेंडूत ३ चौकार मारत ३० धावा केल्या. वाचा- कॅच घेण्यासाठी जेव्हा जडेजा धावला तेव्हाच त्याने गिलला मी कॅच पकडतो असा इशारा केला. तरी तो कॅच घेण्यासाठी धावला आणि जडेजाला धडकला. पण जडेजाने हुशारी दाखवत कॅच घेतला. हा कॅच सोडला असतात तर भारतीय संघाला त्याची मोठी किमत मोजावी लागली असती. वेड आक्रमकपणे फलंदाजी करत होता. वेड बाद झाल्यानंतर अश्विनने स्मिथला शून्यावर बाद केले. त्यानंतर उमेश यादवने हेडला माघारी पाठवले आणि पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने लाबुशानेला बाद करत ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rnsBBc
No comments:
Post a Comment