नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहा आपल्या व्हिडीओमुळे प्रसिद्ध झाली आहे. आतापर्यंत बरेच व्हिडीओ हसीनचे सोशल मीडियावर आलेले आहेत. पण सध्या हसीनचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. हसीन ही आपल्या इंस्टाग्रामवर काही व्हिडीओ अपलोड करत असते. पण गेल्या काही दिवसांमध्ये मात्र हसीनचा एकही व्हिडीओ पाहायला मिळाला नव्हता. पण हसीनने आपल्या चाहत्यांसाठी एक खास व्हिडीओ आता बनवला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच आवडलेला असून तो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये नेमके आहे तरी काय, पाहा... अयोध्येत राम मंदिर निर्माणाला पाच ऑगस्ट रोजी सुरूवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराची कोनशिला स्थापन केली. त्यानंतर हसीनने एक राम मंदिराच्या भूमी पुजनानंतर पोस्ट केली होती. या पोस्टवरून तिला जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देण्यात आली. याबाबत हसीनने एक धक्कादायक वक्तव्य आज केल्याचे पाहायला मिळत होते. काही दिवसांपूर्वी हसीनने म्हटले होते की, " मला ज्या धमक्या मिळाल्या त्याविरोधात मी पोलिस स्थानकात तक्रार केली आहे आणि मला अशी आशा आहे की, त्यांना लवकरच शिक्षा होईल. जर मी आता उत्तर प्रदेशमध्ये असले असते तर माझ्याबाबत नक्कीच काही तरी वाईट घडले असते. पण मी बंगालमध्ये असल्यामुळे मी सुरक्षित आहे. बंगालमध्ये मी माझ्या भावाबरोबर राहत आहे आणि तो माझी काळजीही घेत आहे." म मंदिराच्या बांधकामाला सुरूवात झाल्याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या होत्या आणि आनंद व्यक्त केला होता. पण हसीनाने केलेल्या पोस्टवर कट्टरवाद्यांना राग आला. प्रथम या पोस्टवरून तिला ट्रोल करण्यात आले. त्यानंतर तिला धमकी देण्यास सुरूवात झाली. सोशल मीडियावरून येणाऱ्या धमक्यांना कंटाळून अखेर हसीनाने इस्टाग्रामवर आणखी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडून मदत मागितली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3o3O7sx
No comments:
Post a Comment