मेलबर्न, : भारतीय संघाने आज दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी कसून सराव केला. यावेळी भारतीय संघाबरोबर एका मराठमोळ्या गोलंदाजानेही चांगलाच घाम गाळला. त्यामुळे दुखापतीमुळे या मालिकेत खेळू न शकणाऱ्या मोहम्मद शमीच्या जागी या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने आज कसून सराव केला. या सरावामध्ये मराठमोळा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरही होता. बीसीसीआयने भारतीय संघाबरोबर सराव करत असतानाचा फोटो आज सोशल मीडियावर शेअर केला आहे. शमीला पहिल्या सामन्यात गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे शमी आता उर्वरीत कसोटी मालिका खेळू शकणार नाही. त्यामुळे शमीच्या जागी यावेळी शार्दुलला भारतीय संघात स्थान मिळू शकते. शार्दुलने ऑस्ट्रेलियातील मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. यावेळी शार्दुल चांगाल यशस्वीही ठरला होता. ऑस्ट्रेलियातील वातावरणाशी शार्दुलने आतापर्यंत जुळवून घेतले आहे. त्याचबरोबर शार्दुल हा चांगल्या फॉर्मातही आहे. त्यामुळे या गोष्टीचा फायदा शार्दुलला होऊ शकतो. आता दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात शार्दुलला संधी मिळणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच कसोटी सामन्यात लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर आता भारतीय संघात दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी काही बदल केले जाऊ शकतात अशी चर्चा आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर २६ डिसेंबरपासून सुरू होईल. बॉक्सिंग डे कसोटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन फलंदाजीबाबत मोठ्या काळजीत आहे. संघाची फलंदाजी कशी मजबूत करता येईल यासाठी काही बदल अपेक्षित आहेत. पहिल्या कसोटीतील ३६ धावांचा निचांकी स्कोअर आणि ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतलेली आहे. भारतीय संघात कर्णधार अजिंक्य रहाणे (), मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव या सहा जणांचे खेळणे नक्की आहे. अंतिम अकरामध्ये अन्य सहा जाणांबाबत संघ व्यवस्थापन मोठा निर्णय घेऊ शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JgbMqC
No comments:
Post a Comment