नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध एडिलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ८ विकेटनी पराभव झाल्यानंतर सर्व जण कर्णधार विराट कोहलीच्या सुट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. भारताचे माजी महान खेळाडू सुनील गावसकर यांनी विराटला एक नियम आणि दुसऱ्या खेळाडूंना वेगळा नियम अशा शब्दात यावर टीका केली. वाचा- विराटच्या सुट्टीवर फक्त गावसकर नाही तर अन्य माजी खेळाडू देखील टीका करत आहेत. विराट मुलाच्या जन्मासाठी भारतात आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत १-० असा पिछाडीवर असताना विराटने संघाला सोडून येणे योग्य नाही असे मत आणखी एका माजी खेळाडूने व्यक्त केले आहे. वाचा- भारताचे माजी फिरकीपटू दिलीप दोशी हे विराटच्या सुट्टीबद्दल बोलताना म्हणाले, जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा नॅशनल ड्यूटी पहिली असते बाकीच्या गोष्टी नंतर असतात. हे दोशी यांचे वैयक्तीक मत असले तरी त्यांनी थेट विराट कोहलीवर निशाना साधला आहे. वाचा- दोशी यांच्या मते विराटने भारतात यायला नको होते. काम देशासाठीचे काम पहिला असते. मी विराटच्या जागी असतो तर संघा सोबत थांबलो असतो. बीसीसीआयने विराट कोहलीवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला नाही. बोर्ड नेहमीच अशा महत्त्वाच्या क्षणी खेळाडूंना संघासोबत राहण्याची सक्ती करत नाही. वाचा- एका मुलाखतीत दिलीप दोशी म्हणाले, आता वेळ बदलली आहे. जर एखादा खेळाडू वडील होणार असेल तर त्याला कुटुंबासोबत रहायचे असते. पण जेव्हा तुम्ही नॅशनल ड्यूटीवर असता. तेव्हा अशा बिकट परिस्थितीत संघासोबत रहाणे हे तुमचे कर्तव्य असते. मी विराटच्या जागी असतो तर नक्कीच भारतात आलो नसतो. माझ्यासाठी नॅशनल ड्यूटी पहिली येते. माझ्यासाठी देशाच्या संघाचे नेतृत्व करणे ही गोष्टी सर्वात महत्त्वाची असती. जेव्हा संघाचा पराभव होत असतो तेव्हा खेळाडूने त्यांच्या सोबत रहाणे गरजेचे आहे. वाचा- भारतीय संघाने चांगली कामगिरी करावी ही माझी इच्छा आहे. विराट एक चांगला खेळाडू आहे. ते मैदानावर असतो तेव्हा इतर खेळाडूंना आत्मविश्वास येतो, असे दोशी म्हणाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34HCMH9
No comments:
Post a Comment