Ads

Tuesday, December 22, 2020

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माची अशी सुरु झाली होती प्यारवाली लव्हस्टोरी, लॉकडाऊनचा असाही फायदा...

नवी दिल्ली : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा आज विवाहसोहळा पार पडला. पण या दोघांची लव्हस्टोरी नेमकी कशी आणि कुठे सुरु झाली, याबाबत मात्र बऱ्याच जणांना माहिती नसेल. पण बॉलीवूडच्या चित्रपटांसारखीच त्यांची लव्हस्टोरी रंगल्याचे पाहायला मिळाले. याबाबत धनश्रीने सांगितले की, " भारतामध्ये करोनामुळे लॉकडाऊन सुरु होते. त्यावेळी मी माझ्या डान्सचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हे व्हिडीओ चहलने पाहिले होते. चहलला माझा डान्स आवडला होता आणि त्याला माझ्याकडून काही गोष्टी शिकायच्या होत्या. त्यामुळे आमचे पहिल्यांदा शिक्षक आणि विद्यार्थी असे नाते होते." धनश्री पुढे म्हणाली की, " चहलला माझ्याकडून काही गोष्टी शिकायच्या होत्या, त्यामध्ये डान्सचाही समावेश होता. त्याने माझ्याशी संपर्क साधला आणि मला मार्गदर्शन करणार का, असे विचारले. त्यानंतर मी त्याची शिकवणी घ्यायला लागले. या सर्व कालावधीमध्ये आमच्यामधील शिक्षक आणि विद्यार्थी हे नाते बदलले आणि आम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनलो. आमच्यामध्ये मैत्री झाल्यावर दोघांनी काही गोष्टी शेअर केल्या. त्यानंतर आमच्यामधील संवाद वाढला आणि एकेदिवशी चहलने मला प्रपोज केले. त्यानंतर मीदेखील जास्त वेळ घेतला नाही आणि चहलला होकार कळवला." आयपीएलसाठी युएईला जाण्यापूर्वी चहलने कोरिओग्राफर असलेल्या धनश्री वर्माबरोबर साखरपुडा केला होता. त्यानंतर चहल हा आयपीएल खेळण्यासाठी युएईला गेला होता. त्यानंतर चहल ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता आणि तिथे वनडे आणि ट्वेन्टी-२० मालिका खेळला होता. पण ही मालिका संपवून मायदेशात परतल्यावर चहलने धनश्रीबरोबर आज लग्न केल्याचे पाहायला मिळाले. चहल आणि धनश्री यांनी हिंदू पद्धतीने गुरगाव येथील कर्मा लेक रिसॉर्ट येथे आज लग्न केले. यावेळी त्याचबरोबर चहल आणि धनश्री यांच्या कपड्यांच्या रंगांमध्येही यावेळी सारखेपणा दिसला. चहलने धनश्रीला लॉकडाऊन सुरु असताना प्रपोज केले होते आणि त्यानंतर या दोघांनी काही दिवसांमध्येच साखरपुडा केला होता. आज अखेर या दोघांनी लग्न केल्याचे पाहायला मिळाले. धनश्री ही चांगली डान्सर आहे आणि तिच्या या कौशल्यावरच चहल फिदा झाला होता. त्यामुळेच चहलने धश्रीला लग्नाबाबत विचारले होते आणि त्यानंतर धनश्रीने चहलला होकार दिला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3h9c27k

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...