मेलबर्न: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा ३६ धावांवर ऑल आउट आणि त्यानंतर ८ विकेटनी पराभव झाला होता. मालिकेत १-० पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने मेलबर्न येथील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दोन्ही दिवशी शानदार कामगिरी केली. पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव १९५ धावात गुंडाळला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कर्णधार अजिंक्य रहाणे() ने नाबाद शतक झळकावून सामन्यावर पकड मिळवली. वाचा- बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि मोहम्मद सिराज यांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा समाचार घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणेने प्रथम हनुमा विहारी नंतर ऋषभ पंत सोबत अर्धशतकी भागिदारीकरत भारतीय संघाला पहिल्या डावात आघाडी मिळून दिली. नंतर दिवसाचा खेळ संपण्याआधी त्याने रविंद्र जडेजासोबत नाबाद शतकी भागिदारी करून टीम इंडियाला ८२ धावांची महत्त्वाची आघाडी मिळून दिली. अजिंक्य नाबाद १०४ वर तर जडेजा ४० धावांवर नाबाद आहे. वाचा- भारतीय संघाच्या या कामगिरीवर माजी क्रिकेटपटू () जाम खूश झाला आहे. त्याने भारतीय संघाचे सोशल मीडियावर कौतुक केले आहे. सचिनने ट्विटवर एकापाठोपाठ एक ट्विट शेअर केले आहेत. वाचा- पहिल्या ट्विटमध्ये सचिनने बुमराह, अश्विन आणि सिराज यांचे कौतुक केले आहे. या तिघांमुळे ऑस्ट्रेलियाला कमी धावसंखेवर रोखले. यात हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेने शानदार कामगिरी केली. त्याने गोलंदाजांचा फार हुशारीने बदल केला. वाचा- दुसऱ्या ट्वीटमध्ये सचिनने कसोटीत पदार्पण करणाऱ्या शुभमन गिलचे कौतुक केले आहे. त्याने संघाला चांगली सुरूवात करून दिली. आणि त्यानंतर आणि रविंद्र जडेजाने यांनी केलेल्या भागिदारीमुळे मॅच ऑस्ट्रेलियाच्या हातातून गेली. वाचा- तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वीटमध्ये सचिनने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे. रहाणेने फक्त उत्तम डिफेन्स केला नाही तर चांगले शॉट खेळले. त्याने गोष्टी भारताच्या बाजूने वळवल्या. वाचा- विराट कोहलीने देखील केले कौतुक भारताचा नियमीत कर्णधार विराट कोहली सध्या भारतात आहे. तो मुलाच्या जन्मासाठी पत्नी अनुष्कासोबत थांबण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून आला आहे. अजिंक्यच्या आजच्या शतकी खेळीचे विराटने सोशल मीडियावर कौतुक केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2M5wXwB
No comments:
Post a Comment