सिडनी, : भारताचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये फक्त एकच कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर कोहली भारतात परत येणार आहे. पण भारतात परतण्यापूर्वी कोहलीने एक खास मिटिंग घेतल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. या मिटिंगमध्ये कोहलीने पहिल्या कसोटीतील पराभवाचे खरे कारण सांगितल्याचे पाहायला मिळाले आहे. भारतीय संघातील युवा खेळाडूंचे मनोबल या पराभवानंतर खचलेले असू शकते. त्यामुळे कोहलीने यावेळी युवा खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठी उत्तेजन कसे देता येईल, यावर भर दिल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर पुढच्या सामन्यासाठी संघातील खेळाडूंना आत्मविश्वास देण्यासाठी कोहलीने या खास मिटिंगने आयोजन केले होते. कोहली म्हणाला की, " पराभवानंतर आपल्या भावना व्यक्त करणे खुपच कठिण आहे. पण पहिल्या डावात आपण चांगली आघाडी घेतली होती, पण त्यानंतर आपला डाव कोसळला आणि पराभव पदरी पडला. आपण सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी अथक मेहनत घेतली होती. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी आपण खरे दावेदार होतो. पण त्यानंतर फक्त एका तासामध्ये आपल्याकडून वाईट कामगिरी झाली आणि तिथून सामना जिंकणे हे जवळपास अशक्य असेच होते." कोहलीने सांगितले की, " ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदजांनी पहिल्या डावात ज्या टप्यांवर मारा केला होता, तिथेच त्यांनी दुसऱ्या डावातही केली. पण आमची मानसीकता त्यावेळी चांगली दिसली नाही. कारण आमची मानसीकता जर चांगली असली असती, तर आम्ही नक्कीच चांगली धावसंख्या उभारली असती आणि वेगळे चित्र पाहायला मिळू शकले असते." भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने शानदार ८ विकेटनी विजय मिळवला. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी लोटागंण घातल्याने ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी फक्त ९० धावांचे आव्हान होते. या विजयासह ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात भारताची दाणादाण उडवणारे जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nD4Zq3
No comments:
Post a Comment