![](https://maharashtratimes.com/photo/80026589/photo-80026589.jpg)
नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाच गोलंदाजांसह खेळण्याची भारतीय संघाचे धोरण यशस्वी ठरले. मेलबर्न कसोटीत विजय मिळून भारतीय संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आता टीम इंडियाचे लक्ष्य तिसऱ्या कसोटीवर आहे. बॉक्सिंग डे कसोटीत भारताने चार बदल केले होते आता पुन्हा संघात तीन बदल होण्याची शक्यता आहे. वाचा- तिसऱ्या कसोटीसाठी निवडीसाठी उपलब्ध होणार आहे. रोहितने गेल्या वर्षीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात ओपनर म्हणून फलंदाजी केली होती. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विजयानंतर पाच गोलंदाजांना घेऊन खेळणार असल्याचे म्हटले आहे. वाचा- सलामीच्या जोडीत असलेल्या शुभमन गिलने पदार्पणाच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली. तर त्याचा साथिदार पहिल्या दोन्ही कसोटीत अपयशी ठरला त्यामुळे तिसऱ्या कसोटीतून त्याला वगळले जाऊ शकते. मयांकला या मालिकेत फक्त एकदा दुहेरी धावसंख्या करता आली. मयांकची याआधीची कसोटीतील कामगिरी चांगली आहे. पण जर भारताने मयांकला बाहेर बसवले तर तो मोठा निर्णय ठरले. मयांकच्या जागी रोहितला संधी दिली जाईल. रोहित शर्मासाठीची सलामीवीर म्हणून खरी कसोटी असेल. या वर्षी न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीत दुखापतीमुळे त्याला खेळता आले नव्हते. वाचा- मयांकने गेल्या १८ महिन्यात शतक आणि द्विशतकी खेळी केली आहे. तर रोहित मोठ्या ब्रेकनंतर मैदानात उतर आहे. त्यामुळे त्याला सलामीला पाठवण्या ऐवजी मधळ्या फळीत संधी दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत विहारीच्या जागी संघात रोहित दिसू शकेल असे मत माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद म्हणाले. वाचा- हनुमा विहारीला देखील दोन्ही कसोटीत धावा करता आल्या नाहीत. जर मयांकच्या जागी रोहितला संधी दिली तर विहारीच्या जागी केएल राहुला संघात घेतले जाऊ शकते. मेलबर्न कसोटीत जलद गोलंदाज उमेश यादव जखमी झाला होता. त्याच्या जागी टी नटराजन याला संधी दिली जाऊ शकते.
कर्णधार अजिंक्य रहाणेने मेलबर्नमधील विजयानंतर देखील विजयाचे संकेत दिले होते. त्यामुळे आता तिसऱ्या कसोटीत त्याची रणनिती काय असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37VOaBb
No comments:
Post a Comment