मेलबर्न, : भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव हा दुसऱ्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो तिसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमीही दुखापतीमुळे या दौऱ्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात जर उमेश खेळू शकणार नसेल, तर त्याच्या जागी भारताच्या यॉर्कर किंगला संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात उमेश यादवला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले होते. उमेश दुसऱ्या डावात फक्त ३.३ षटकेच गोलंदाजी करू शकला होता. उमेश जेव्हा चौथा चेंडू टाकायला गेला तेव्हा त्याला स्नायूंमध्ये दुखत असल्याचे जाणवले. उमेशची दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची होती की, त्यानंतर उमेशला मैदान सोडावे लागले. यानंतर उमेशला थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. उमेश जर तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नसेल तर कोणाला संधी द्यायची, हा विचार भारताच्या संघ व्यवस्थापनाला करावा लागणार आहे. पण काही जणांच्या मते या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. उमेश जर खेळू शकणार नसेल तर त्याच्या जागी टी. नटराजनला संघात स्थान द्यायला हवे, असे बऱ्याच जणांना वाटत आहे. नटराजनला नेटमध्ये सराव देण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर नेण्यात आले होते. पण त्यानंतर ट्वेन्टी-२० मालिकेत नटराजनला खेळवण्यात आलेय नटराजनने या मालिकेत नेत्रदीपक कामगिरी करत ६ विकेट्स मिळवले होते. त्यामुळे उमेश जर तिसरा सामना खेळू शकत नसेल तर नटराजनला संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. अजून कोणत्या गोलंदाजांना मिळू शकते संधी, पाहा... तिसऱ्या सामन्यात जर उमेश खेळू शकणार नसेल, तर त्याच्या जागी मराठमोळा शार्दुल ठाकूर किंवा नवदीप सैनी या दोन युवा वेगवान गोलंदाजांना संधी मिळण्याचीही शक्यता आहे. पण नटराजनने ट्वेन्टी-२० मालिका चांगलीच गाजवली होती. त्यामुळे यावेळी शार्दुल आणि नवदीप यांच्यापैक्षा नटराजना अधिक पसंती मिळू शकते, असे म्हटले जात आहे. पण त्यापूर्वी उमेशची दुखापत नेमकी कशी आहे, हे बीसीसीआयला पाहावे लागेल. जर उमेश खेळू शकणार नसेल, तर भारतीय संघ व्यवस्थापनाला तिसऱ्या सामन्यात नेमके कोणाला खेळवायचे, हा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात नेमके काय होते, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34U5Yuz
No comments:
Post a Comment