मेलबर्न: बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार ११२ धावांवर धावबाद झाला. रहाणे त्याच्या कसोटी क्रिकेटच्या करिअरमध्ये प्रथमच धावबाद झाला. याआधी पहिल्या कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहली देखील धावबाद झाला होता. वाचा- तिसऱ्या दिवशी ४९ धावांवर खेळत असताना एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. जडेजाने रन घेण्यासाठी पळाला पण अजिंक्य रहाणे अगदी काही इंचाने क्रिझपासून दूर राहिला आणि ११२ धावांवर बाद झाला. जडेजाच्या चुकीमुळे धावबाद झाल्यानंतर देखील अजिंक्यने चाहत्यांचे मन जिंकले. वाचा- रहाणेला तिसऱ्या पंचांनी बाद दिल्यानंतर त्याने जडेजावर राग व्यक्त केला नाही. तर जडेजाला संभाळून घेतले आणि अर्धशतकासाठी शुभेच्छा दिल्या. रहाणेच्या या प्रतिक्रियेवर सोशल मीडियावर सर्व जण त्याचे कौतुक करत आहेत. वाचा- अजिंक्यने २२३ चेंडूत १२ चौकारांसह ११२ धावा केल्या. त्याने जडेजासोबत सहाव्या विकेटासाठी १२१ धावांची भागिदारी केली. जडेजाने ५७ धावा केल्या आणि भारताने पहिल्या डावात १३१ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने खेळ संपला तेव्हा १३६ धावांवर ६ विकेट घेतल्या होत्या. वाचा- सचिन तेंडुलकरनंतर मेलबर्न मैदानावर शतक करणारा अजिंक्य रहाणे दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी सचिनने १९९९ साली बॉक्सिंग डे कसोटीत ११६ धावा केल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/355qSar
No comments:
Post a Comment