मेलबर्न, : भारतीय संघाबरोबरच त्यांच्या चाहत्यांना आज एक गूड न्यूज मिळाली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ही गूड न्यूज दिली आहे. बीसीसीआयचा हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यालाकडे आपला मोर्चा वळवताना भारतीय संघाला गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच वाईट बातम्या मिळाल्या होत्या. पण आज भारतीय संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा ट्वेन्टी-२० सामना खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती, त्याचबरोबर त्याच्या पायातील स्नायू दुखावले होते. पण आता जडेजा फिट झाल्याचे पाहायला मिळत आहे. जडेजा नेट्समध्ये गोलंदाजी करत असतानाचा एक व्हिडीओ बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, " जर जडेजा गोलंदाजीचे मोठे स्पेल टाकण्यासाठी फिट असेल तर नक्कीच त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात येईल. जडेजाला जर संघात खेळवायचे असेल तर कदाचित हनुमा विहारीला संघाबाहेर जावे लागेल. पण जडेजा संघात आला तर भारतीय संघाला यावेळी पाच गोलंदाजांचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे जडेजा फिट असले तर नक्कीच त्याला संघात स्थान देण्यात येईल." पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या हाताला आता फ्रॅक्चर झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तो या मालिकेला मुकणार आहे. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहलीही आगामी तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ निवडताना भारतीय संघापुढे अडचण निर्माण झाली होती. पण जडेजा फिट झााल्याने त्याचा पर्याय आता संघ व्यवस्थापनापुढे असेल. रोहित शर्मा हा तिसऱ्या कसोटी सामन्यापासून संघाबरोबर असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा ७ जानेवारीपासून सिडनी येथे सुरु होणार आहे. त्यानंतर अखेरचा आणि चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे जर कोणतीही वाईट परिस्थिती निर्माण झाली नाही तर रोहितला सिडनीमध्येच ठेवण्यात येणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2M3Adsz
No comments:
Post a Comment