नवी दिल्ली: पाकिस्तानचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघातील पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा १०१ धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. वाचा- न्यूझीलंडने विजय मिळवला असला तरी पाकिस्तानने चांगली लढत दिली आणि सामना पाचव्या दिवसापर्यंत खेचला. या सामन्यात शतक झळकावणाऱ्या केन विलियमसनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पण लोक कौतुक करत आहेत ते () या न्यूझीलंडच्या गोलंदाजाचे... वाचा- न्यूझीलंडची फलंदाजी सुरू असताना पाकचा गोलंदाज शाहीन अफरीदीचा यॉर्कर चेंडू नीलच्या पायाला लागला. यामुळे त्याचा अंगठा तुटला. पण तरी देखील नीलने विश्रांती घेतली नाही. दुखापतीसह तो मैदानात उतरला आणि एक दोन नव्हे तर ४९ षटके टाकली. फक्त ओव्हर नाही तर नीलने चार विकेट घेतल्या. त्याने पहिल्या डावात २१ तर दुसऱ्या डावात २८ ओव्हर टाकल्या. वाचा- नीलने पेन किलरचे इंजेक्शन घेतले आणि गोलंदाजी केली. दुखापत असताना देखील त्याने शानदार गोलंदाजीकरत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्याने दुसऱ्या डावात पाकचा शतकवीर फवाद आलमची विकेट घेतली. नीलच्या या हिम्मतीसाठी सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले जात आहे. वाचा- तो वारंवार मैदानाबाहेर जात होता आणि इंजेक्शन घेऊन परत गोलंदाजीसाठी येत होता. ही गोष्ट आमच्यासाठी अनोखी होती. खेळण्याची हिम्मत आणि संघासाठी खेळण्याची जिद्द आम्हाला देखील आश्चर्य वाटले. आम्हाला त्याचा अभिमान वाटतो, असे कर्णधार केन विलियमसन म्हणाला. अंगठ्याला दुखापत झाली असताना देखील पहिल्या कसोटीत मैदान जागवणारा नील पाकविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून संघाबाहेर झाला आहे. पण संपूर्ण क्रिकेट विश्व त्याला सलाम करत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pBh5k3
No comments:
Post a Comment