मेलबर्न, IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या एका क्रिकेटपटूवर आता एका सामन्याची बंदी आलेली आहे. कारण मैदानात केलेली एक चुक या क्रिकेटपटूला चांगलीच महागात पडली आहे. त्यामुळे त्याच्यावर एक सामन्याची बंदी आणण्याची कारवाई आता करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पाने मैदानात शिविगाळ केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मैदानात झाम्पाने अपशब्द वापरले. त्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी झाम्पाला बोलवले आणि त्याची चुक निदर्शनास आणून दिली. झाम्पाने ही चुक मान्य केली असून आता त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. झाम्पा हा सध्या बिग बॅश लीगमध्ये खेळत आहे. यावेळी मेलबर्न आणि सिडनी या दोन संघांमध्ये सामना सुरु होता. झाम्पा हा मेलबर्नकडून खेळत होता आणि सिडनीचा संघ फलंदाज करत होता. यावेळी १६व्या षटकात झाम्पाच्या गोलंदाजीवर सिडनीच्या कॅलम फर्ग्युसनने एक फटका मारला आणि तो एक धाव घेण्यासाठी धावला. त्यावेळी मेलबर्नच्या संघातील एका खेळाडूकडून हा चेंडू सुटला आणि सिडनीला चौकार मिळाला. त्यानंतर झाम्पा चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. यानंतर झाम्पाने मैदानात अपशब्द वापरायला सुरुवात केली. त्यामुळेच झाम्पावर ही कारवाई करण्यात आली. झाम्पाने या सामन्यात गोलंदाजी करताना ४९ धावा देत तीन विकेट्स मिळवल्या, त्याचबरोबर फलंदाजी करताना २३ धावाही केल्या. पण गोलंदाजी करताना झाम्पाने जे अपशब्द वापरले त्याचा चांगलाच फटका त्याला बसला आहे. आता बिग बॅश लीगमधील पुढचा सामना त्याला खेळता येणार नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबतची माहिती आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38MTy8Y
No comments:
Post a Comment