दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात (ICC) ने दशकातील सर्वोत्तम कसोटी, वनडे आणि टी-२० संघाची घोषणा केली आहे. पुरुषांमध्ये तिन्ही संघात रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्र सिंह धोनी, आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह या पाच खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय. यातील विराट हा एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याचा तिनही संघात समावेश केलाय. त्याच्याकडे कसोटी संघाचे तर महेंद्र सिंह धोनीकडे टी-२० आणि वनडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. आणि यांचा वनडे आणि टी-२० संघात समावेश केलाय. वाचा- पुरुष संघात पहिल्या स्थानावर भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्मा आहे. चौथ्या क्रमांकावर विराट कोहली, सातव्या क्रमांकावर माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि १०व्या क्रमांकावर जसप्रीत बुमराहचा समावेश केला गेलाय. या संघात सर्वाधिक खेळाडू भारताचे आहेत. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या प्रत्येकी दोन खेळाडूंचा समावेश आहे. वाचा- आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम टी-२० ( ) संघाचे नेतृत्व महेंद्र सिंह धोनीकडे देण्यात आले आहे. असा आहे आयसीसीचा या रोहित शर्मा, (भारत) ख्रिस गेल, (वेस्ट इंडिज) एरॉन फिंच, (ऑस्ट्रेलिया) विराट कोहली, (भारत) एबी डिव्हिलियर्स, (दक्षिण आफ्रिका) ग्लेन मॅक्सवेल, (ऑस्ट्रेलिया) महेंद्र सिंह धोनी (कर्णधार),(भारत) कायरन पोलार्ड, (वेस्ट इंडिज) राशिद खान, (अफगाणिस्तान) जसप्रीत बुमराह,(भारत) लसित मलिंगा (श्रीलंका) वाचा- वनडे संघ ( Men's ODI Team of the Decade) टी-२० प्रमाणेच वनडे संघाचे नेतृत्व भारताच्या महेंद्र सिंह धोनीकडे देण्यात आले आहे. वनडे संघात भारताच्या तिघाांचा समावेश केला गेलाय. पहिल्या स्थानावर रोहित शर्मा, नंतर भारताचा कर्णधार विराट कोहली तिसऱ्या स्थानावर तर महेंद्र सिंह धोनी सहाव्या स्थानावर आहे. टी-२० प्रमाणेच वनडे संघात सर्वाधिक भारताचे खेळाडू आहेत. त्यानंर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका देशातील प्रत्येकी दोन खेळाडूंचा समावेश आहे. अशा आहे दशकातील सर्वोत्तम वनडे संघ रोहित शर्मा (भारत) डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) विराट कोहली (भारत) एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) शाकीब अल हसन (बांगलादेश) महेंद्र सिंह धोनी (भारत) बेन स्ट्रोक्स (इंग्लंड) मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) इम्रान ताहिर (दक्षिण आफ्रिका) लसित मलिंगा (श्रीलंका) वाचा- कसोटी संघाचा कर्णधार विराट ( ICC Men's Test Team of the Decade) आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम कसोटी संघात फक्त दोघा भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. पण या संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. विराट चौथ्या स्थानावर आहे. त्यानंतर आठव्या स्थानावर फिरकीपटू आर अश्विन आहे. कसोटी संघात इंग्लंडच्या चार खेळाडूंचा समावेश आहे. तर ऑस्ट्रेलिया, भारत या देशातील प्रत्येकी दोन खेळाडू आहेत. असाआहे कसोटी संघ एलॅस्टर कुक (इंग्लंड) डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) केन विलियमसन (न्यूझीलंड) विराट कोहली (भारत) स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) कुमार संगकारा (श्रीलंका) बेन स्ट्रोक्स (इंग्लंड) आर अश्विन (भारत) डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका) स्टुअर्ट ब्रॅट (इंग्लंड) जेमी अॅडरसन (इंग्लंड) वाचा- महिलांमध्ये दशकातील वनडे संघात मिताली राज आणि झुलन गोस्वामी या दोन भारतीय खेळाडूंचा समावेश केलाय. महिला संघात टी-२० भारताच्या हरमनप्रीत कौर पाचव्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाची विकेटकीपर एलिसा हेली आहे. या संघात भारताच्या पुनम यादवला ११वे स्थान मिळाले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mSzyXm
No comments:
Post a Comment