दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीला सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर जाला आहे.दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीला सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. भारताचा कर्णधार याला Sir Garfield Sobers Award पुरस्कार मिळाला आहे. तो आयसीसीचा या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने या काळात २० हजार ३९६ धावा केल्या असून त्यात ६६ शतक आणि ९४ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटची सरासरी ५६.९७ इतकी असून तो २०११ वर्ल्डकप विजेत्या संघात होता. भारताचा माजी कर्णधार याला आयसीसीचा या दशकातील स्पिरीट ऑफ क्रिकेट पुरस्कार मिळाला आहे. अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान याला टी-२० मधील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. राशिदची सरासरी फक्त १२.६२ इतकी असून त्याने तीन वेळा चार विकेट तर दोन वेळा पाच विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला कसोटीमधील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला. त्याने या दशकात ७ हजार ४० धावा केल्या. त्याची सरासरी ६५.७९ इतकी आहे. या काळात त्याने २६ शतक आणि २८ अर्धशतक केली आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mU0Rki
No comments:
Post a Comment