मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताचा कर्णधार ११२ धावांवर धावबाद झाला. कसोटी क्रिकेटच्या करिअरमध्ये रहाणे प्रथमच धावबाद झाला. भारतीने पहिल्या डावात १३१ धावांची मोठी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाला सामन्यात कमबॅक करण्याची संधी असली तरी एक खास गोष्टी आहे जी भारतीय चाहत्यांना निराश करणार नाही. वाचा- मेलबर्न क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला विजय मिळण्याची शक्यता आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अजिंक्य रहाणेचे शतक होय. जेव्हा जेव्हा अजिंक्यने शतक झळकावले आहे तेव्हा तेव्हा भारताने सामना कधीच गमावला नाही. भारताने पहिल्या डावात ३२६ धावा करत १३१ धावांची महत्त्वाची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर संपुष्ठात आल्यानंतर तिसऱ्या दिवशी पहिले सत्र संपण्याआधी भारताचा पहिला डाव संपुष्ठात आला. तिसऱ्या दिवशी भारताने कालच्या धावसंख्येत ४९ धावांची भर टाकली. वाचा- अजिंक्य रहाणेने ११२ धावा केल्या. तर रविंद्र जडेजाने ५७ धावा केल्या. त्याचे हे कसोटीमधील १५वे अर्धशतक ठरले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी १२१ धावांची भागिदारी केली. रहाणेने २२३ चेंडूत १२ चौकारांसह ११२ धावा केल्या. ११ शतक- ७ विजय, ३ ड्रॉ अजिंक्यने या कसोटीत १२वे शतक झळकावले. याआधी ११ शतकावेळी भारताने ७ (एका सामन्यातील दोन्ही डावात शतक, त्यामुळे ७ सामन्यात ८ शतक) विजय मिळवले. तर ३ सामने ड्रॉ झाले. रहाणेचे शतक आणि भारताचा पराभव न होणे या अनोख्या योगामुळे यावेळी देखील विजय मिळेल अशी आशा चाहत्यांना आहे. वाचा- रहाणेची शतके आणि सामन्याचा निकाल ११८ धावा विरुद्ध न्यूझीलंड- सामना ड्रॉ १०३ धावा विरुद्ध इंग्लंड- सामना जिंकला १४७ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया- सामना ड्रॉ १२६ धावा विरुद्ध श्रीलंका- सामना जिंकला १२७ आणि १००* धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका- सामना जिंकला १०८* धावा विरुद्ध वेस्ट इंडिज- सामना ड्रॉ १८८ धावा विरुद्ध न्यूझीलंड- सामना जिंकला १३२ धावा विरुद्ध श्रीलंका- सामना जिंकला १०२ धावा विरुद्ध वेस्ट इंडिज- सामना जिंकला ११५ धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका- सामना जिंकला
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34Q4xgH
No comments:
Post a Comment