मेलबर्न: 2nd test ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर सुरू असलेल्या चर्चेनुसार अपेक्षेप्रमाणे भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहे. वाचा- पहिल्या कसोटीत खराब कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी शुभमन गिलचा संघात समावेश केला गेला आहे. गिल भारताकडून कसोटीत पदार्पण करेल. तर वृद्धीमान साहाच्या ऐवजी ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आले आहे. अष्टपैलू रविंद्र जडेजाला देखील संघात स्थान दिले गेले आहे. त्याच बरोबर दुखापतीमुळे संघा बाहेर गेलेल्या मोहम्मद शमीच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिली केली आहे. सिराज देखील गिल प्रमाणेच कसोटीत पदार्पण करेल. वाचा- दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल होणारच होते. कर्णधार विराट कोहली मुलाच्या जन्मासाठी भारतात आला आहे. तर जलद गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतमुळे मालिकेतील उर्वरीत सामने खेळू शकणार नाही. या दोन बदल्याशिवाय पृथ्वी शॉ आणि वृद्धीमान साहा यांना खराब कामगिरीमुळे बाहेर बसवले गेले आहे. त्याच्या जागी शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांचा संघात समावेश केला गेला आहे. मोहम्मद शमीच्या जागी मोहम्मद सिराजचा समावेश केला गेलाय. त्याच बरोबर अष्टपैलू रविंद्र जडेजाला संघात स्थान दिले गेले आहे. वाचा- पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ८ विकेटनी पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना () उद्यापासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. या सामन्यापासून भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aIygvF
No comments:
Post a Comment