मेलबर्न: aus vs ind 2nd test ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने गोलंदाजी आणि फलंदाजीत शानदार कामगिरी केली. या सामन्यात भारतीय संघात चार बदल करण्यात आले होते. त्यात विकेटकीपर म्हणून ( )ला संधी देण्यात आली होती. पंतने कसोटीत ४० चेंडूत २९ धावा केल्या. त्याने कर्णधार अजिंक्य रहाणे सोबत अर्धशतकी भागिदारी करून संघाला आघाडी मिळून देण्यात महत्त्वाची भूमिक पार पाडली. वाचा- पंत मोठी खेळी साकारू शकला नाही. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध २५वी धाव करताच तो एका खास रेकॉर्ड लिस्टमध्ये दाखल झाला. पंतने ऑस्ट्रेलियामध्ये सलग आठव्या डावात २५ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो फक्त दुसरा तर जागतिक क्रिकेटमधील चौथा फलंदाज आहे. वाचा- ऑस्ट्रेलियामध्ये पंतच्या आधी कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी फक्त तिघा फलंदाजांनी केली आहे. यात इंग्लंडचे महान फलंदाज वॅली हेमंड, वेस्ट इंडिजचे महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स आणि भारताचे रुसी सुर्ती यांचा समावेश आहे. पंतने ऑस्ट्रेलियातील अखेरच्या आठ डावात अनुक्रमे २५, २८, ३६, ३९,३३, १५९*, २९ अशा धावा केल्या आहेत. वाचा- बॉक्सिंग डे कसोटीत त्याने ४० चेंडूत ३ चौकारांसह २९ धावा केल्या. त्याने अजिंक्य रहाणे सोबत केलेल्या वेगवान अर्धशतकी खेळीमुळे भारताला आघाडी घेता आली. मिचेल स्टार्कने त्याची विकेट घेतली. एडिलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताचा ८ विकेटनी पराभव झाला होता. त्यानंतर वृद्धीमान साहाला खराब कामगिरीमुळे बाहेर केले गेले आणि पंतचा संघात समावेश केला गेला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aLzNBu
No comments:
Post a Comment