नवी दिल्ली : भारतामध्ये जर क्रिकेट खेळायचे असेल तर त्यासाठी आता बीसीसीआयने नवीन नियम बनवले आहेत. या नियमांचे पालन जर खेळाडू आणि क्रिकेटशी निगडीत असलेल्या व्यक्तींनी केले नाही, तर त्यांना भारतामध्ये क्रिकेट खेळता येणार नाही. बीसीसीआयचे नवीन नियम आहेत तरी काय, पाहा...बीसीसीआयच्या नवीन नियमांबाबत एका अधिकाऱ्यांनी यावेळी माहिती दिली. या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बीसीसीआयने प्रत्येक राज्य संघटनेला हे नियम पाठवले आहेत आणि त्यांचे कडक पालन करण्यासही सांगितले आहे. त्यामुळे भारतात जर क्रिकेट खेळायचे असेल तर या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. पाहा बीसीसीआयचे काही नवीन नियम...
- खेळाडू जेव्हा हॉटेलमध्ये पोहाचतील तेव्हा त्यांना सहा दिवस क्वारंटाइन राहावे लागेल. त्याचबरोबर हॉटेलमध्ये उतरल्यानंतर त्यांची पहिल्या, तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी करोनाची चाचणी होणार आहे. जर खेळाडू करोना चाचणी पॉझिटीव्ह सापडले नाहीत तरच त्यांना सराव करण्यात देण्यात येणार आहे.
- जर खेळाडूंना बायो बबल वातावरणाच्या बाहेर जायचे असेल, तर त्यांना डॉक्टरांची परवानगी घेणे अनिवार्य असेल. जर खेळाडू आणि संबंधित कोणत्याही व्यक्तीने नियम मोडले तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
- क्रिकेट खेळाताना चेंडूवर लाळ किंवा थुंकी लावता येणार नाही.
- जर एखादा व्यक्ती बायो बबल वातावरणातील नसेल आणि सराव सुरु असताना त्याने जर चेंडूंला हात लावला तर तो थेट खेळाडूंकडे देण्यात येणार नाही. खेळाडूंना हा चेंडू देण्यापूर्वी पंच त्याला सॅनिटाइझ करतील आणि त्यानंतरच तो सरावासाठी दिला जाईल.
- जिथे सामान खेळवाल जाणार आहे त्या स्डेडियमबरोबरच, खेळाडूंचे हॉटेल, सरावाचे ठिकाण आणि प्रवास या सर्व गोष्टी बायो बबवलमध्ये असतील.
- बाया बबल वातावरण हे फक्त खेळाडूंसाठीच नसेल, तर प्रशिक्षक, सहायय्क प्रशिक्षक, सामनाधिकारी, समाचोलक या सर्वांना बायो बबलमध्ये राहणे अनिवार्य असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3n8OKjD
No comments:
Post a Comment