नवी दिल्ली: एडिलेड येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने सर्वात खराब अशी फलंदाजी केली. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात निचांकी अशी धावसंख्या नोंदवण्यात आली. पॅक कमिन्स आणि जोश हेजलवुड यांनी भारतीय फलंदाजांना फक्त हजेरीसाठी मैदानात बोलवले. वाचा- ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून आता दुसरी कसोटी मेलबर्न क्रिकेट मैदानावर २६ डिसेंबरपासून होणार आहे. या मालिकेत भारत ऑस्ट्रेलियाला उत्तर देईल अशी सर्वांना आशा आहे. दुसऱ्या कसोटीत पृथ्वी शॉ आणि वृद्धीमान साहा यांना वगळण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांच्या जागी नवे चेहरे दिसतील. विराट बाळाच्या जन्मासाठी भारतात येणार असून शमीच्या हाताला फॅक्चर झाले आहे. वाचा- अशाच भारतीय संघ व्यवस्थापनाने ( ) आणि चेतेश्वर पुजार ( ) यांना कठोर संदेश पाठवला आहे. हे दोन्ही खेळाडू फक्त कसोटी क्रिकेट खेळतात. पहिल्या कसोटीत अजिंक्यने ४२ आणि शून्य तर पुजाराने ४३ आणि शून्य धावा केल्या होत्या. आता तर विराट कोहलीच्या गैरहजेरीत अजिंक्यकडे नेतृत्व दिले जाणार आहे. अशात संघ व्यवस्थापनाने संघातील या दोन वरिष्ठ खेळाडूंना स्पष्ट शब्दात संदेश दिल्याचे समजते. वाचा- रहाणे आणि पुजारा यांना दुसऱ्या डावात त्यांच्याकडून अपेक्षित असलेली कामगिरी करता आली नाही. या दोघांनी पुढाकार घेऊ जबाबदारीने खेळावे, अशा शब्दात कठोर संदेश दिल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. वाचा- पुजाराने गेल्या वेळी २०१८ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धमाकेदार कामगिरी केली होती. पण त्यानंतर त्याची कामगिरी खास अशी झाली नाही. तर रहाणेच्या कामगिरीतपण गेल्या काही वर्षात घसरण झाली आहे. रहाणेला पुढील तीन सामन्यात नेतृत्व करावे लागणार आहे. पृथ्वी शॉला खराब कामगिरीमुळे दुसऱ्या कसोटीत स्थान मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे मयांक अग्रवालसह शुभमन गिल सलामीला येऊ शकतो. विराट कोहलीच्या जागी केएल राहुलचा संघात स्थान मिळू शकते. गोलंदाजीत एक बदल करावाच लागणार आहे. मोहम्मद शमीच्या जागी मोहम्मह सिराज संघात दिसू शकले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3h91rcQ
No comments:
Post a Comment