नवी दिल्ली, : भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना जिंकला. पण अजिंक्यसाठी एक मेसेज टर्निंग पॉइंट ठरल्याचे आता समोर आले आहे. या मेसेजमुळेच अजिंक्यच्या आयुष्यात मोठा बदल घडल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात, तसे ते अजिंक्यच्या कारकिर्दीतही आले. ही गोष्ट आहे दक्षिण आफ्रिकेतील. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता आणि कसोटी मालिका सुरु होती. दरबान येथे २९ डिसेंबरला सुरु असलेल्या कसोटी सामन्यात अजिंक्यचे शतक फक्त चार धावांनी हुकले होते. त्यानंतर अजिंक्यला एक मेसेज आला. त्या मेसेजमध्ये लिहिले होते की, " कसोटी क्रिकेट नेमकं काय असतं आणि त्यामधील शतकाचे मोल किती असते, हे तुला आता नक्कीच समजले असेल." या एका मेसेजनंतर अजिंक्यच्या कारकिर्दीला चांगलीच कलाटणी मिळाल्याचे पाहायला मिळाले. अजिंक्यने या मेसेजला यावेळी उत्तरही दिले होते. अजिंक्य या मेसेजला उत्तर देताना म्हणाला की, " मी तुम्हाला शतकासाठी फार काळ वाट पाहायला लावणार नाही." अजिंक्यने आपला शब्द यावेळी पाळल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यानंतर न्यूझीलंडच्या दौऱ्यात अजिंक्यने शतक झळकावले. अजिंक्यटने यावेळी ११८ धावांची खेळी साकारली आणि आपला शब्द पाळल्याचे पाहायला मिळाले. अजिंक्य रहाणेच्या बाबतीत घडला असा योगायोग रहाणेने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरच्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात नेतृत्व करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. पण यापूर्वी जेव्हा रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथील सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते, तेव्हादेखील काही गोष्टी अशाच घडल्याचे पाहायला मिळाले होते. धरमशाला येथे झालेल्या सामन्यात कोहली खेळणार खेळणार नव्हता आणि मालिका १-१ अशी बरोबरीत होती. या सामन्यातील दोन्ही डावांत रहाणेने दमदार फलंदाजी केली होती. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रहाणेने या सामन्यातही मैदानावर येऊन विजय साकारला होता. आजच्या सामन्यात रहाणे फलंदाजीला येईल की नाही, माहिती नव्हते. पण भारताचे दोन फलंदाज बाद झाले आणि रहाणे फलंदाजीला आला. हा या दोन्ही सामन्यांतील योगायोग म्हणाला लागेल. अजिंक्यने या सामन्यात विजयी धावही घेतली. त्यामुळे अजिंक्य आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये नेतृत्व करताना दोन्ही वेळेला पास झालेला पाहायला मिळत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38Q6haU
No comments:
Post a Comment