मेलबर्न : India vs Australia ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याला मेलबर्न येथे सुरूवात झाली आहे. दोन्ही देशातील चार सामन्यांच्या मालिकेतील ही असून याला कसोटी असे देखील म्हणतात. ऑस्ट्रेलियाने एडिलेड येथे झालेल्या डे-नाइट कसोटीत भारताचा ८ विकेटनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. आता दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कसोटीला बॉक्सिंग डे कसोटी का म्हणतात जाणून घेऊयात. वाचा- 'बॉक्सिंग डे' चा इतिहास... जगभरातील अनेक देशात ख्रिसमसच्या (२५ डिसेंबर) दुसऱ्या दिवस म्हणजे २६ डिसेंबरला बॉक्सिंग डे असे म्हटले जाते ख्रिसमस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा लोक मित्र आणि नातेवाइकांना भेटतात तेव्हा बॉक्समध्ये काही गिफ्ट करून देतात. ही परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. एका मान्यतेनुसार या दिवसाचे नाव ख्रिसमस बॉक्सवरून दिले गेले. त्याच बरोबर ख्रिसमसच्या दिवशी ज्या कर्मचाऱ्यांना काम करावे लागते त्याचे मालक २६ डिसेंबर रोजी त्यांना भेटवस्तू देतात. यात भोजनाचा देखील समावेश असतो. बॉक्सिंग डे शी जोडली केलेली आणखी एक थेअरी म्हणजे ख्रिसमसच्या वेळी चर्च मध्ये एक बॉक्स ठेवला जातो. ज्यात लोक गरजू लोकांसाठी दान करतात. चर्च मधील लोक दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबरला तो बॉक्स उघडतात आणि गरजू लोकांमध्ये वाटतात. वाचा- बॉक्सिंग डे हा गोष्ट तरी स्पष्ट झाली आता याचा आणि क्रिकेटचा कसा काय संबंध जोडला गेला. १८९२ साली मेलबर्न क्रिकेट मैदानावर शेफील्ड शील्डमध्ये एक सामना झाला. यात व्हिक्टोरिया आणि न्यू साउथ वेल्स यांच्यात ख्रिसमसच्या दरम्यान क्रिकेट सामना खेळवण्याची सुरूवात झाली. मेलबर्नमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना १९५० मध्ये झाला. हा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झाला. ती मॅच २२ डिसेंबर रोजी झाली होती. पण हळूहळू बॉक्सिंग डे क्रिकेटचा भाग झाला. पाहा- १९८०च्या आधी मेलबर्नमध्ये फक्त चार बॉक्सिंग डे सामने झाले होते. ते १९५२, १९६८, १९७४ आणि १९७५ झाले होते. त्या शिवाय एडिलेड येथे १९६७, १९७२ आणि १९७६ साली सामने झाले. १९७५ साली वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीत लक्षात आले की बॉक्सिंग डे कसोटी मॅच मोठी होऊ शकते. ती मॅच पाहण्यासाठी ८५ हजार ५९६ प्रेक्षक आले होते. त्यानंतर बॉक्सिंग डे दिवशी कसोटी मॅच सुरू करण्याची परंपरा सुरू झाली. १९७५ नंतर ऑस्ट्रेलियाने पाच वर्षांनी मेलबर्न येथे बॉक्सिंग डे कसोटी मॅच खेळवण्यास सुरूवात केली त्यानंतर फक्त एकदा म्हणजे १९८९ साली मेलबर्न येथे कसोटी सामना झाला नाही. त्या वर्षी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात वनडे मॅच झाली होती. आता फक्त ऑस्ट्रेलियाच नाही तर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका देखील बॉक्सिंग डे मॅच भरवते. वाचा- 'बॉक्सिंग डे टेस्ट मॅच'ची सुरुवात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १९१३ मध्ये जोहान्सबर्ग येथे झाली होती. पण त्यानंतर दुसरा 'बॉक्सिंग डे' कसोटी सामना त्यानंतर ४८ वर्षांनी खेळवण्यात आला होता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने पहिला 'बॉक्सिंग डे' कसोटी सामना १९६८-६९मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3huQ3rX
No comments:
Post a Comment