मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनासाठी २०२० हे वर्ष धोक्याचं ठरलं, कारण या वर्षात बऱ्याच वाईट गोष्टी या रैनाच्या आयुष्यात घडल्याचे पाहायला मिळाले. हे वर्ष सरत असताना रैनाला मुंबईच्या पोलिसांनी अटक केल्याचंही पुढे आलं. त्याचबरोबर रैनाच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातही बऱ्याच वाईट गोष्टी घडल्याचे पाहायला मिळाले. आयपीएल सुरु होण्यापूर्वीच रैनाने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती जाहीर केली. पण त्यानंतर झालेल्यया आयपीएलमध्ये तो खेळू शकला नाही. आयपीएल सुरु होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या संघातील काही सदस्य टकरोना पॉझिटीव्ह असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रैनाने कोणचेही न ऐकता संघाला सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो भारतात दाखल झाला. पण या गोष्टीचे विपरीत परीणाम त्याच्यावर झाल्याचे पाहायला मिळाले. रैनाने संघाला सोडल्यावर संघमालक एन. श्रीनिवासन हे त्याच्यावर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. त्यानंतर रैना आणि श्रीनिवासन यांच्यातील संबंध बिघडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता पुढच्या आयपीएलच्यावेळी रैनाला चेन्नईच्या संघात स्थान मिळणार नाही, असे चित्र उभे राहीले होते. रैनासाठी हादेखील एक मोठा धक्का होता. त्यामुळे आता पुढच्या आयपीएलमध्ये रैनापुढे कोणत्या संघातून खेळायचे, हा मोठा प्रश्न असेल. आयपीएल सोडून भारतात आल्यावर रैनाच्या काकांवर (आत्याचे पती) प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. काही दरोडेखोरांनी रैनाच्या आत्याच्या घरावर हल्ला केला होता. त्यामध्ये रैनाच्या काकांना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर रैनाच्या काकांचे निधन झाले होते. त्यामुळे रैनासाठी हादेखील एक मोठा धक्का होता. मुंबई पोलिसांनी काल मध्यरात्री भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी मध्यरात्री साडे तीन वाजता विमानतळाजवळील ड्रॅगन फ्लाय क्लबवर छापा टाकला. त्यावेळी या क्लबने करोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवले होते. या क्लबमध्ये सुरेश रैनासह ऋतिक रोशनची माजी पत्नी सुझॅन आणि गायक गुरु रंधवाही होते. या सर्वासह एकूण ३४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने काही नियम बनवले आहेत. त्यानुसार रात्री ११ वाजल्यानंतर कोणतीही पार्टी करण्यास बंदी आहे. पण विमानतळावरील जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमधील ड्रॅगन फ्लाय क्लबमध्ये रात्री ११ नंतरही पार्टी सुरु होती. पोलिसांनी मध्यरात्री साडे तीन वाजता जेव्हा या क्लबवर छापा टाकला. त्यावेळीही तिथे पार्टी सुरुच होती. त्यामुळे पोलिसांनी यावेळी सर्वांनाच अटक केल्याचे पाहायला मिळत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3azxLUE
No comments:
Post a Comment