नवी दिल्ली: भारताचा माजी क्रिकेटपटू सिक्सर किंग ( ) ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने मोठा झटका दिला आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या युवराज सिंगला पुन्हा देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळायचे होते. यासाठी त्याने () आणि अध्यक्ष सौरव गांगुली यांना पत्र लिहले होते. पण त्याची ही विनंती बीसीसीआयने फेटाळून लावली. वाचा- युवराज सिंगला देशांतर्गत टी-२० लीग ( )त खेळायचे होते. युवराज सिंग पंजाब संघाकडून खेळणार होता. या स्पर्धेसाठीच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला होता. पण बीसीसीआयने युवीचे क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याचे स्वप्न भंग केले. वाचा- ... युवीने १० जून २०१९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याचवेळी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणार नाही असे म्हटले होते. काही महिन्यांपूर्वी त्याने पुन्हा क्रिकेट खेळणार असल्याचे जाहीर केले. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात भारतातील देशांतर्गत क्रिकेट पुन्हा सुरू होणार आहे. सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत युवराजला खेळायचे होते. पण बीसीसीआयने राज्य संघात त्याच्या निवडीला परवानगी नाकारली. वाचा- पंजाब संघाने संभाव्य ३० खेळाडूंमध्ये युवराजचा समावेश केला होता. पण पंजाब क्रिकेट असोसिएशनने निवडलेल्या संघात युवीचे नाव नाही. गेल्या आठवड्यात युवराजने मोहालीमध्ये सराव केला होता. पीसीएचे सचिन पुनीत बाली यांनी युवीला निवृत्ती मागे घेऊन पंजाबकडून खेळण्याची विनंती केली होती. वाचा- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज आयपीएलमध्ये खेळला होता. त्यानंतर तो जगभरातील अन्य काही टी-२० लीग क्रिकेटमध्ये दिसला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34RP4wx
No comments:
Post a Comment