मेलबर्न: भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या मैदानावर होणारी ही लढत भारतीय संघासाठी हिमशिखरा एवढी अवघड आहे. या मैदानावरील भारतीय संघाची कामगिरी देखील फार चांगली नाही. अर्थात मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारतीय संघाला फक्त ३ विजय मिळवता आले आहेत. यातील दोन विजय तर ३९ वर्षापूर्वी मिळवले होते. त्यानंतर २०१८ साली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने अखेरचा विजय मिळवला होता. वाचा- भारतीय संघाने या मैदानावर आतापर्यंत १३ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी आठमध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. तर तीनमध्ये भारताचा विजय झालाय. अन्य दोन लढती ड्रॉ झाल्या आहेत. वाचा- मेलबर्न मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली लढत १९४८ साली झाली होती. तेव्हा लाला अमरनाथ भारताचे तर सर डॉन ब्रॅडमन हे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार होते. ही लढत ऑस्ट्रेलियाने २३३ धावांनी जिंकली होती. या मैदानावर सलग तीन लढतीत पराभव झाल्यानंतर भारताने १९७७ साली पहिला विजय मिळवला. हा भारताचा ऑस्ट्रेलिया भूमीवरील पहिला विजय होता. तेव्हा बिशन सिंह बेदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने २२२ धावांनी विजय मिळवला होता. वाचा- या मैदानावर दुसरा विजय १९८१ साली सुनिल गावसकर कर्णधार असताना मिळवला. ती लढत भारताने ५९ धावांनी जिंकली. त्यानंतर या मैदानावर भारताने सलग ५ लढती गमावल्या. दोन सामने ड्रॉ झाले. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १९८५ साली झालेली लढत ड्रॉ झाली. नंतर २०१४ साली महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली झालेली लढत देखील ड्रॉ झाली. भारताने विराटच्या नेतृत्वाखाली २०१८ साली अखेरचा विजय मिळवला. ही लढत भारताने १३७ धावांनी जिंकली. वाचा- आता भारतीय संघ जेव्हा २६ डिसेंबर रोजी मैदानात उतरेल तेव्हा त्यांच्यावर पहिल्या लढतीत झालेल्या दारूण पराभवाचे टेन्शन असेल. मालिकेत १-०ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे. विराट कोहीलच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व दिले जाणार आहे. एडिलेड कसोटीत ३६ धावात भारताचा ऑल आउट झाल्याने फलंदाजीत गेलेला आत्मविश्वास मिळवावा लागले. या मैदानावरील भारतीय संघाची कामगिरी पाहता हे काम अवघड असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3awxvpu
No comments:
Post a Comment