मोटेरा: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष असणाऱ्या () ने कधी टी-२० सामने खेळले नाहीत. पण गांगुली टी-२० प्रमाणे आज देखील धमाकेदार फलंदाजी करू शकतो हे त्याने दाखवून दिले. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर गांगुलीने स्फोटक अर्धशतक झळकावले. मोटेरा () या जगातील सर्वात मोठ्या मैदानावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या सदस्यांच्यामध्ये एक मैत्रिपूर्ण लढत झाली. ही लढत बीसीसीआयचे सेक्रेटरी XI विरुद्ध अध्यक्ष XI या दोन संघात झाली. यात सेक्रेटरी संघाने अध्यक्ष संघाचा २८ धावांनी पराभव केला. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा २४ डिसेंबर म्हणजे आज होणार आहे. या बैठकीत २३ महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून त्याला मंजूरी दिली जाणार आहे. अध्यक्ष संघाचे नेतृत्व गांगुली तर सेक्रेटरी संघाचे नेतृत्व यांनी केले. या सामन्यात गांगुलीने अर्धशतक केले. मोटेरा स्टेडियमवर अर्धशतक करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. गांगुलीने ३२ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या. त्याच बरोबर गोलंदाजीत ३ षटकात २६ धावा देत एक विकेट घेतली. गांगुलीने प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार जय शहा यांची विकेट घेतली. जय शहा २ धावांवर बाद झाला. या सामन्यात अझरूद्दीने देखील खेळत होता. त्याने सेक्रेटरी संघाकडून २२ चेंडूत ३७ धावा केल्या. सेक्रेटरी संघाने प्रथम फलंदाजी करत १२ षटकात ३ बाद १२८ धावा केल्या. उत्तरादाखल अध्यक्ष संघाला १०० धावा करता आल्या. ही लढत भलेही मैत्रीपूर्ण असली तरी मोटेरा स्टेडियमवर अर्धशतक करून सौरव गांगुलीने हा विक्रम स्वत:च्या नाववर केला. ६३ एकर इतक्या मोठ्या या मैदानावर अर्धशतक करणारा गांगुली पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. या मैदानाच्या निर्मितीसाठी ७५० कोटी इतका खर्च आला आहे. मोटेराची क्षमता १ लाख १० हजार इतकी आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nNiaVw
No comments:
Post a Comment