सिडनी, : दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांतील खेळाडूंसाठी एक सुवर्णसंधी असणार आहे. कारण या सामन्यात जो खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करेल, त्याला खास मेडल ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाकडून देण्यात येणार आहे. हे मेडल नक्की कशासाठी देण्यात येणार आहे, पाहा... ऑस्ट्रेलियाच्या संघाचे पहिले संघ नायक जॉनी मुलघ होते, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी खास मेडल बनवण्यात आले आहे, मुलघ मेडल असे याचे नाव आहे. मुलघ हे ऑस्ट्रेलियाच्या आदिवासी संघाचे पहिले कर्णधार होते. ज्यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने १८६८ साली ब्रिटेनचा दौरा केला होता. हा या संघाचा पहिला दौरा होता आणि मुलघ यांनी खेळाडूंनी एकत्र करत संघाची बांधणी केली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यावेळी सांगितले की, " भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात जो खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करेल, त्याला मुलघ मेडल देण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने जेव्हा पहिला दौरा केला होता तेव्हा मुलघ हे पहिले कर्णधार होते. त्यामुळे आम्ही त्यांच्या नावाने हे मेडल देण्याचे ठरवले आहे." ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघ सध्या कसोटी मालिका खेळत आहे. चार सामन्यांपैकी पहिली एडिलेड येथील डे-नाइट कसोटीत भारताचा ८ विकेटनी पराभव झाला. आता दुसरी कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. या कसोटीला बॉक्सिंग डे कसोटी असे देखील म्हटले जाते. आता सर्व सामान्य क्रिकेट चाहत्यांना हा प्रश्न पडणे स्वाभावीक आहे की कसोटी क्रिकेट तर ठिक आहे पण यातील बॉक्सिंगचा अर्थ काय. तर यातील बॉक्सिंगचा आणि बॉक्सिंग खेळाचा काहीही संबंध नाही. जगभरातील अनेक देशात ख्रिसमसच्या (२५ डिसेंबर) दुसऱ्या दिवस म्हणजे २६ डिसेंबरला बॉक्सिंग डे असे म्हटले जाते ख्रिसमस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा लोक मित्र आणि नातेवाइकांना भेटतात तेव्हा बॉक्समध्ये काही गिफ्ट करून देतात. ही परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. एका मान्यतेनुसार या दिवसाचे नाव ख्रिसमस बॉक्सवरून दिले गेले. त्याच बरोबर ख्रिसमसच्या दिवशी ज्या कर्मचाऱ्यांना काम करावे लागते त्याचे मालक २६ डिसेंबर रोजी त्यांना भेटवस्तू देतात. यात भोजनाचा देखील समावेश असतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2WBlzuB
No comments:
Post a Comment