नवी दिल्ली: भारतीय संघाचा एडिलेड कसोटी सामन्यात ८ विकेटनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त पराभव झाला असता तर भारतीय चाहत्यांना इतके वाइट वाटले नसते पण टीम इंडियाचा लाजिवाणा पराभव झालाय. दुसऱ्या डावात भारताला फक्त ३६ धावा करता आल्या. या पराभवानंतर भारतीय संघात आता मोठे बदल होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. वाचा- मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ चार बदलांसह उतरू शकते. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि जलद गोलंदाज मोहम्मद शमी हे दोघेही यापुढील तिनही सामन्यांसाठी उपलब्ध नसतील. विराटच्या गैरहजेरीत अजिंक्य राहणे भारतीय संघाचे नेतृत्व करेल. भारतीय संघात विराट कोहली ऐवजी केएल राहुल () ला संधी दिली जाऊ शकते. तर मोहम्मद शमीच्या जागी युवा जलद गोलंदाज मोहम्मद सिराज याचा समावेश होऊ शकतो. सिराज दुसऱ्या सामन्यात कसोटीत पदार्पण करू शकतो. वाचा- विराट आणि शमी यासाठी भारतीय संघात बदल होणाार हे सर्वांना माहिती आहेच. पण या शिवाय भारतीय संघात आणखी दोन बदल होऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टीम इंडिया सलामीची जोडी बदलू शकते. डे-नाइट कसोटी सामन्यात दोन्ही डावात अपयशी ठरलेला पृथ्वी शॉला बाहेर बसवले जाऊ शकते. त्याच्या जागी शुभमन गिल () चा संघात समावेश होईल. तो मयांक सोबत सलामीला उतरू शकतो. याच बरोबर आणखी एक बदल म्हणजे विकेटकीपर वृद्धीमान साहाला देखील संघाबाहेर केले जाऊ शकेत. साहाच्या ऐवजी विकेटकीपर आणि फलंदाज म्हणून ऋषभ पंत ( )चा समावेश केला जाईल. त्याने ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात धमाकेदार शतक झळकावले होते. साहाने पहिल्या सराव सामन्यात अर्धशतक केले होते. वाचा- दुसऱ्या कसोटीपासून कर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणेकडे येणार आहे. तो फक्त कसोटी क्रिकेट खेळत असल्याने त्याच्याकडून धावांची अधिक अपेक्षा आहे. त्याच बरोबर चेतेश्वर पुजाराला देखील धावा कराव्या लागतील. वाचा- अपडेट असा असू शकतो संभाव्या संघ- मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, अजिंक्य रहाणे (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), हनुमा विहारी, आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mJaXVf
No comments:
Post a Comment