नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ३६ धावांवर ऑल आउट झाला आणि त्यानंतर सामन्यात ८ विकेटनी त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय संघाला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल केले. पण यांनी मात्र भारतीय संघाची हिम्मत वाढवणारा मेसेज दिला आहे. वाचा- एडिलेड येथे झालेल्या डे-नाइट कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाला. या सामन्यात भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमधील त्यांची सर्वात निचांकी अशी धावसंख्या केली. भारताच्या पराभवानंतर सर्वसामान्य चाहत्यांपासून ते माजी क्रिकेटपटूंनी खेळाडूंच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण अमिताभ बच्चन यांनी भारतीय संघाची पुढील सामन्यासाठी हिम्मत कशी वाढेल यासाठीचा मेसेज केला. वाचा- अपडेट बच्चन यांनी ट्विटवर रविवारी एक मेसेज लिहला, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना... काळजी करण्याची गरज नाही टीम इंडिया... हा फक्त एक वाइट दिवस होता. आपण पुन्हा चांगली कामगिरी करू. आपल्या सर्वांच्या आयुष्यात वाइट दिवस येतात. पण सेट बॅकचे उत्तर कमबॅक देऊ!! वाचा- भारतीय संघासाठी अमिताभ बच्चन यांनी दिलेला हा मेसेज व्हायरल होण्यास वेळ लागला नाही. फक्त दोन तासात १० हजार लोकांनी त्याला लाइक केले होते. तर ४०० लोकांनी रिट्विट केले होते. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर सोशल मीडियावर विराट कोहली, त्याची पत्नी अनुष्का शर्मा, संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आदी लोकांना ट्रोल केले गेले. भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग देखील संघाच्या या कामगिरीने नाराज दिसला. जेव्हा १९ धावांवर भारताच्या ६ विकेट गेल्या होत्या. तेव्हा सरेंडर कर दिया बिल्कुल यार, असे ट्विट त्याने केले होते. अनेकांनी सोशल मीडियावर कोच बदलण्याची मागणी केली होती. शास्त्रींच्या ऐवजी राहुल द्रवीडला कोच करा अशी मागणी काही जण करत होते. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2LILI8r
No comments:
Post a Comment