नवी दिल्ली : सध्याच्या घडीला एक कॅच क्रिकेट विश्वामध्ये चांगलीच गाजत आहे. कारण या खेळाडूने हवेत सूर मारत ही कॅच पकडल्याचे पाहायला मिळाले आहे. या कॅचचा व्हिडीओ क्रिकेट विश्वामध्ये सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही कॅच पाहायला मिळाली ती न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात. या मालिकेतील पहिले दोन सामने न्यूझीलंडने जिंकत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली होती. त्यानंतर पाकिस्तानने तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला चार विकेट्स राखून पराभूत केले आणि न्यूझीलंडने मालिका २-१ अशी जिंकली. या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर हैदर अलीचा झेल उडाला होता. हा झेल न्यूझीलंडचा क्षेत्ररक्षक डॅरेल मिचेल यांनी हवेत उडी मारून भन्नाट झेल पकडल्याचे पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आपल्या ट्विटरवर या कॅचचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. ट्वेन्टी-२० मालिकेत पाकिस्तानच्या संघाला पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनी अखेरचा एक सामना जिंकला आहे. या सामन्यामुळे पाकिस्तानच्या संघाचे मनोबल उंचावू शकेल. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका २६ डिसेंबरला सुरु होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2WDgz8I
No comments:
Post a Comment