Ads

Saturday, December 26, 2020

बॉक्सिंग डे कसोटी मुंबईच्या अजिंक्य रहाणेला मिळाला हा खास मान

मेलबर्न : मेलबर्न मैदानावर सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामना हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील १००वा कसोटी सामना आहे. या दोन्ही देशातील कसोटी पहिला कसोटी सामना १९४७ साली झाला होता. भारताविरुद्ध १०० कसोटी सामने खेळणारा ऑस्ट्रेलिया हा दुसार देश ठरला आहे. याआधी इंग्लंडने भारताविरुद्ध १००हून अधिक कसोटी सामने खेळले आहे. वाचा- भारतीय संघाने १९४७ साली जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. तेव्हा भारताचे कर्णधार लाला अमरनाथ तर ऑस्ट्रेलियाचे कर्णधार सर डॉन ब्रॅडमन होते. आज १००व्या कसोटीत भारतीय तर टिम पेन ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. १००व्या कसोटीत संघाचे नेतृत्व करण्याची संधी रहाणेला मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २५व्या कसोटीत नवाब पटोदी कर्णधार होते. ५०व्या कसोटीत मोहम्मद अझरुद्दीन तर ७५व्या कसोटीत अनिल कुंबळेने देशाचे नेतृत्व केले. १००व्या कसोटीचा मान अजिंक्य रहाणेला मिळाला. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशात सुट्टीवर गेल्याने रहाणेला ही संधी मिळाली. वाचा- १००व्या कसोटीपर्यंतचा प्रवास पहिला कसोटी सामना- लाला अमरनाथ आणि डॉन ब्रॅडमन (१९४७) २५वा कसोटी सामना- नवाब पटोदी आणि ली लाउरी (१९६९) ५०वा कसोटी सामना- अझरूद्दीन आणि एलन बॉर्डर (१९९२) ७५ वा कसोटी सामना- अनिल कुंबले आणि रिकी पॉन्टिंग (२००८) १००वा कसोटी सामना- अजिंक्य रहाणे आणि टीम पेन (२०२०) वाचा- चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने पहिला कसोटी सामना गमावला आहे. ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतील आहे. पुढील तीन सामन्यांसाठी विराट कोहली उपलब्ध नसल्याने रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. १००व्या कसोटीत रहाणेने ऑस्ट्रेलियाचा १९५ धावांत ऑल आउट करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्याने चांगले नेतृत्व केले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Kv9m8q

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...