मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने एक दिवस आधी अंतिम अकरा खेळाडूंची नावे जाहीर केली. बॉक्सिंग डे कसोटीसाठी भारताने चार बदल केले आहेत. यातील दोन बदल तर आधीच सर्वांना माहिती होते. विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांच्या ऐवजी अन्य दोघांना संधी मिळणार होती. पण पहिल्या कसोटीतील खराब कामगिरीमुळे कोणाला संघाबाहेर केले याची सर्वांना उत्सुकता होती. वाचा- मेलबर्न कसोटीसाठी शुभमन गिल, रविंद्र जडेजा, () आणि मोहम्मद सिराज यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी सराव सामन्यात पंतने धमाकेदार फलंदाजी केली होती. तरी अनुभवाच्या जोरावर साहाला पंसती देण्यात आली. पण साहा फलंदाजीत अपयशी ठरला. त्याने पहिल्या डावात ९ तर दुसऱ्या डावात ४ धावा केल्या. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत खेळण्याची संधी गमावली. पंत फलंदाजीबाबत सहा पेक्षा चांगला पर्याय आहे. वाचा- ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या सराव सामन्यात त्याने ७३ चेंडूत १०२ धावा केल्या होत्या. इतक नव्हे तर २०१८-१९च्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ५० हून अधिकच्या सरासरीने ३५० धावा केल्या होत्या. यात एका शतकाचा समावेश होता. एडिलेड कसोटीत दोन्ही डावात अपयशी ठरलेल्या साहाला संघ व्यवस्थापनाने दाखवलेला विश्वास टीकवता आला नाही. करिअरच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या ३६ वर्षीय साहासाठी पुढील वाटचाल अवघड होणार आहे. साहाने त्याची अखेरची कसोटी खेळल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. वाचा- पंत २०१८च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शतक झळकावले होते. पंतने जर ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केली तर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मायदेशातील कसोटी मालिकेसाठी त्याचा विचार केला जाऊ शकतो. इंग्लंडचा संघ फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. तेव्हा चार कसोटी, पाच टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. वाचा- वृद्धीमान साहाला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी देण्यात आली होती. पण त्याला धावा करता आल्या नाहीत. या देशांच्या विरुद्ध त्याने एकही अर्धशतक झळकावले नाही. पंतच्या नावावर किमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकांची नोंद आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये शतक करणारा तो एकमेव भारतीय विकेटकिपर आहे. वाचा- पंतने गेल्या काही दिवसात फिटनेसवर फोकस केला आहे. गुलाबी चेंडूत झालेल्या सराव सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली होती. भारतीय संघासाठी पंतचा समावेश करणे हा एक मास्टर स्ट्रोक ठरू शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34Lhf0l
No comments:
Post a Comment