मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी सर्वांचे लक्ष एकाच खेळाडूवर होते, ते म्हणजे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज होय. काही दिवसांपूर्वी स्मिथला आयसीसीचा या दशकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडूचा पुरस्कार मिळाला. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्टीव्ह स्मिथकडून फार मोठी अपेक्षा होती. पण पहिल्या दोन कसोटीत तो अपयशी ठरला. वाचा- भारताच्या २०१८ सालच्या दौऱ्या स्मिथ ऑस्ट्रेलिया संघात नव्हता. तेव्हा भारताने मालिाक २-१ अशी जिंकली होती. तेव्हा स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर नसल्याने भारताचा विजय सोपा झाला असे बोलले जात होते. पण यावेळी स्मिथ संघात असून ऑस्ट्रेलियाला त्याचा फायदा झाल नाही असे दिसले. वाचा- एडिलेड आणि मेलबर्न कसोटीत मिळून स्मिथला फक्त १० धावा करता आल्या आहेत. यातील दोन वेळा भारताच्या आर अश्विनने त्याला बाद केले. एसइएन रेडिओशी बोलताना स्मिथ म्हणाला, मी अश्विनच्या गोलंदाजीला चांगल्या पद्धतीने खेळू शकलो नाही जितके मला खेळायला हवे होते. मला त्याला अधिक दबावात टाकायचे होते. मी अश्विनला वचर्स्व ठेवण्याची संधी दिली. माझ्या करिअरमध्ये अन्य कोणत्याही फिरकीपटूला अशी संधी दिली नाही. मला आक्रमक होऊन फलंदाजी करावी लागेल जेणेकरून अश्विनला त्याचे धोरण बदलावे लागेल, असे स्मिथ म्हणाला. वाचा- सध्या तरी मी मैदानावर अधिक वेळ थांबण्याचा विचार करतोय. ही गोष्टी माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे. स्वत:वर विश्वास ठेवून नैसर्गिक खेळ करावा लागले, असे स्मिथने सांगितले. अश्विन म्हणाला... ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्मिथची विकेट खुप महत्त्वाची आहे. यासाठी भारताने योजना तयार केली होती. ती योजना यशस्वी ठरल्याबद्दल अश्विनने आनंद व्यक्त केला. जर स्टीव्ह स्मिथला बाद केले नाही तर भारतीय संघासाठी अडचणीचे ठरू शकते, असे अश्विनने चॅनल ७ शी बोलताना सांगितले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JtrChK
No comments:
Post a Comment