मेलबर्न, : भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे हा नेहमीच भारताचा माजी महान क्रिकेटपटू राहुल द्रविडला आदर्श मानत आला आहे. पण ऑस्ट्रेलियातील आजच्या विजयानंतर अजिंक्यने द्रविडशी बरोबरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्यने नेत्रदीपक कामगिरी केली, शतक झळकावले आणि त्याचबरोबर संघाचा कर्णधार कसा असायला हवा, याचा उत्तम वस्तुपाठ दाखवून दिला. पण त्याचबरोबर अजिंक्यने द्रविडबरोबर एक बरोबरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर ही गोष्ट भारताच्या कोणत्याही कर्णधाराला ऑस्ट्रेलियामध्ये अजूनही करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत काही भारतीय कर्णधारांनी विजय मिळवला. पण जे द्रविड आणि अजिंक्य यांना करता आले ते कोणालाही करता आले नाही. कारण ऑस्ट्रेलियामध्ये विजयी धाव घेण्याची संधी फक्त द्रविड आणि अजिंक्य यांनाच आतापर्यंत मिळाल्याचे समोर आले आहे. या दोघांनाच आतापर्यंत हा भारतीय कर्णधार म्हणून मान मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. आजच्या सामन्यात अजिंक्यने विजयी धाव घेतली आणि भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले. ही कामगिरी यापूर्वी भारतीय कर्णधार म्हणून फक्त द्रविडला करता आली होती. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी भारतासाठी विजयी धाव घेण्याचा मान यापूर्वी द्रविडला मिळाला होता. त्यानंतर हा मान आता अजिंक्यला मिळाला आहे. पण या दोघांव्यतिरीक्त कोणत्याही भारतीय कर्णधाराला ही गोष्ट करता आलेली नाही. अजिंक्य रहाणेच्या बाबतीत घडला असा योगायोगरहाणेने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरच्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात नेतृत्व करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. पण यापूर्वी जेव्हा रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथील सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते, तेव्हादेखील काही गोष्टी अशाच घडल्याचे पाहायला मिळाले होते. धरमशाला येथे झालेल्या सामन्यात कोहली खेळणार खेळणार नव्हता आणि मालिका १-१ अशी बरोबरीत होती. या सामन्यातील दोन्ही डावांत रहाणेने दमदार फलंदाजी केली होती. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रहाणेने या सामन्यातही मैदानावर येऊन विजय साकारला होता. आजच्या सामन्यात रहाणे फलंदाजीला येईल की नाही, माहिती नव्हते. पण भारताचे दोन फलंदाज बाद झाले आणि रहाणे फलंदाजीला आला. हा या दोन्ही सामन्यांतील योगायोग म्हणाला लागेल. अजिंक्यने या सामन्यात विजयी धावही घेतली. त्यामुळे अजिंक्य आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये नेतृत्व करताना दोन्ही वेळेला पास झालेला पाहायला मिळत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3o1md0r
No comments:
Post a Comment