सिडनी, : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारताचा माजी महान क्रिकेटपटू राहुल द्रविडला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पाठवावे, अशी मागणी चाहत्यांनी केली होती. पण द्रविडला खरंच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पाठवणार का, याबाबतचा खुलासा बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी आज केला आहे. याबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत सांगितले की, " पहिल्या कसोटीतील कामगिरीवर आम्ही नाराज आहोत आणि त्यामुळे बीसीसीआय चिंतेत आहे. पण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा याबाबत चिंतेत आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाची कामगिरी सुधारावी यासाठी ते योजना बनवत आहेत. संघ व्यवस्थापनाच्या संपर्कात राहूनच या गोष्टी ठरवण्यात येणार आहेत. मी याबाबत आशावादी असून पुढच्या सामन्यात भारतीय संघाकडून चांगली कामगिरी होईल, अशी मला आशा आहे." द्रविडला संघाची मदत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवणार का, या प्रश्नावर शुक्ला म्हणाले की, " सध्याच्या घडीला कोणीही ऑस्ट्रेलियाजा जाणार नाही. भारताची कामगिरी पहिल्या डावात चांगली झाली होती, पण दुसऱ्या डावात त्यांच्याकडून निराशाजनक कामगिरी झाली. कधी कधी अशा गोष्टी क्रिकेटमध्ये पाहायला मिळत असतात. भारतीय संघातील खेळाडूंकडे चांगली गुणवत्ता आहे. त्यामुळे मेलबर्न कसोटी सामन्यात त्यांच्याकडून चांगली कामगिरी होईल, अशी मला आशा आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात नेमके काय करायला हवे, याबाबत आमची चर्चा सुरु आहे." ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघ सध्या कसोटी मालिका खेळत आहे. चार सामन्यांपैकी पहिली एडिलेड येथील डे-नाइट कसोटीत भारताचा ८ विकेटनी पराभव झाला. आता दुसरी कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. या कसोटीला बॉक्सिंग डे कसोटी असे देखील म्हटले जाते. आता सर्व सामान्य क्रिकेट चाहत्यांना हा प्रश्न पडणे स्वाभावीक आहे की कसोटी क्रिकेट तर ठिक आहे पण यातील बॉक्सिंगचा अर्थ काय. तर यातील बॉक्सिंगचा आणि बॉक्सिंग खेळाचा काहीही संबंध नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ay3h5I
No comments:
Post a Comment