नवी दिल्ली : भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या एका मुलाखतीमध्ये एक अजब खुलासा केला आहे. रवींद्र जडेजाच्या एका चुकीमुळे रोहित शर्माने आपला मृत्यू फार जवळून पाहिला होता आणि त्याला जडेजाला मारावेसे वाटत होते. कारण एका गंभीर प्रसंगातून ते बचावले होते खरे, पण त्यावेळी जडेजाने मोठी चुक केली होती. जेव्हा भारतीय संघ कोणत्याही दौऱ्यावर जातात तेव्हा ते तेथील काही महत्वाच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देतात. एका दौऱ्यावर रोहित आणि अजिंक्य आपल्या पत्नींसमवेत जंगल सफारीला गेले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर जडेजाही होता. जंगलामध्ये बिबटे पाहण्यासाठी हे सर्व गेले होते. तिथे २-३ बिबळे होते आणि त्यांच्या मागून आम्ही जाऊ असे त्यांना वाटले होते. पण ज्यावेळी ते जंगलात गेले त्यावेळी नजारा वेगळाच पाहायला मिळाला. या खेळाडूंची गाडी जिथे होती तिथून फक्त २५ मीटरच्या अंतरावर दोन बिबटे होते आणि त्यांनी शिकार केली होती. बिबटे आपल्या शिकारीचा आनंद आस्वाद घेत होते. पण त्यावेळी जडेजा मोठ मोठ्याने ओरडायला लागला आणि त्या बिबट्यांना हैराण करायला लागला. त्या बिबट्यांना जडेजा आपल्याकडे बोलवत होता. त्याचवेळी एका बिबट्याने त्यांच्याकडे पाहिले आणि तो आता काहीही करण्याच्या तयारीत दिसत होता. याबाबत रोहित शर्माने नेमकं काय सांगितलं आहे, पाहा... रोहित या घटनेबाबत काय म्हणाला पाहा...रोहित म्हणाला की, " जेव्हा बिबटे काही खात असतील तर त्यांना हैराण करायचे नसते. कारण त्यावेळी त्यांना राग येऊ शकतो. पण जडेजा त्यावेळी मोठमोठ्याने ओरडायला लागला आणि त्यांना आपल्या जवळ बोलवत होता. त्यावेळी एका बिबट्याने त्यांच्याकडे पाहिले. त्यावेळी मी जडेजाला सांगितले की, हे जंगल आहे. त्यांनी ठरवलं तर आपल्याला दोन मिनिटांत उचलून घेऊन जातील. त्यावेळी मी जे काही अनुभवले ते सांगू शकत नाही. त्यावेळी मला राग आला होता आणि जडेजाला त्यावेळी मारावे, असे मला वाटत होते."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37CuJx9
No comments:
Post a Comment